न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील १२२ कोटी रुपयांच्या अपहाराप्रकरणी (NICB Scam) बांधकाम व्यावसायिक धर्मेश जयंतीलाल पौन (Dharmesh Jayantilal Paun) (५८) याला आर्थिक गुन्हे शाखेने रविवारी (16 फेब्रु.) अटक केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी महाव्यवस्थापक हितेश मेहता (Hitesh Mehta) याच्यामार्फत गैरव्यवहारातील ७० कोटी रुपये बांधकाम व्यावसायिक पौनला मिळाल्याचा आरोप आहे. (NICB Scam)
आरोपी पौनने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) अधिकाऱ्यांकडे कबुली दिली होती. दोन्ही आरोपींना याप्रकरणी रविवारी न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी तिसऱ्या आरोपीची ओळख पटली असून त्याच्या सहभागाबाबत तपास सुरू आहे. (NICB Scam)
हेही वाचा-Accident News : अयोध्येकडे निघालेल्या भाविकांच्या गाडीला अपघात; ४ जणांचा मृत्यू, तर १९ जखमी
१२२ कोटी रुपयांच्या अपहाराप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने बँकेचे महाव्यवस्थापक हितेश मेहता (५७) याला शनिवारी अटक करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन याला शनिवारी रात्री आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्यानंतर रविवारी त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली. पौन हा कांदिवली पश्चिम येथील श्रीजी शरण या इमारतीतील रहिवासी आहे. (NICB Scam)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community