१३ जानेवारी या दिवशी प्रयागराज (Prayagraj) येथील कुंभमेळ्यात प्रथम अमृतस्नान झाले. त्यानंतर कोट्यवधी भाविकांना प्रयागराजला भेट देत अमृतस्नान केले आहे. महा कुंभमेळा प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत एकूण 52.83 कोटी भाविकांनी संगमात स्नान केले आहे. (Mahakumbh 2025)
(हेही वाचा – Earthquake in Delhi NCR : भूकंपाच्या धक्क्याने दिल्ली हादरली ; इमारतींच्या आत जोरदार कंपने जाणवताच लोक घाबरुन घराबाहेर)
सामान्य भाविकांसह विदेशातील अनेक देशांच्या प्रतिनिधींच्या पथकानेही कुंभमेळ्याला भेट देत अमृतस्नान केले आहे.
१० देशांच्या आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाने केले अमृत स्नान
१६ जानेवारी २०२४ या दिवशीही १० देशांच्या २१ सदस्यीय आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाने महाकुंभपर्वाला भेट दिली आहे. त्यांनी पवित्र त्रिवेणी संगमात अमृत स्नानही केले. याचे आयोजन केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. या शिष्टमंडळात फिजी, फिनलँड, गयाना, मलेशिया, मॉरिशस, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, त्रिनिदाद आणि संयुक्त अरब अमिराती या १० देशांच्या सदस्यांचा समावेश आहे.
७७ देशाच्या ११८ राजदूतांचे संगमघाटावर स्नान
१ फेब्रुवारी २०२४ या दिवशी ७७ देशांतील ११८ राजदूतांनी संगम घाटावर स्नान केले. अमेरिका, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, फ्रान्स, रशिया, स्वित्झर्लंड, जपान, न्यूझीलंड, जर्मनी, नेपाळ, कॅनडा यासह ७७ देशांतील ११८ राजदूतांचा यात समावेश आहे. या राजदूतांनी प्रयागराज महाकुंभ आणि तिथल्या व्यवस्थापनाचे मनापासून कौतुक केले आहे.
भूतानच्या राजानेही केले संगमस्नान
भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी ४ फेब्रुवारी या दिवशी संगमात स्नान केले. यानंतर गंगा पूजा आणि आरती करण्यात आली.
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह देशभरातील अनेक नेत्यांनी कुंभपर्वात संगमस्नान केले आहे.
काँग्रेसचा (Congress) मात्र एकही नेता अद्याप कुंभपर्वात सहभागी झालेला नाही. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी हे कुंभस्नान पर्वाला भेट देणार का, या प्रश्नावर आता काँग्रेसने खुलासा केला आहे.
राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) १९ फेब्रुवारीला महाकुंभाला जाणार असल्याचा दावा काँग्रेस नेते अजय राय यांनी केला आहे. इटावा येथे ते पत्रकारांशी बोलत होते. अजय राय म्हणाले की, “राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत आम्ही सर्व जण 19 फेब्रुवारीला महाकुंभला जाणार आहोत. तिथे हर हर महादेव असेल.” (Mahakumbh 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community