नवी दिल्ली (New Delhi) रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीची (New Delhi Railway Station Stampede) घटना घडल्यानंतर रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेने 4 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. यापैकी तीन गाड्या नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून धावतील आणि एक ट्रेन आनंद विहार (Anand Vihar) टर्मिनलवरून धावेल. (Mahakumbh)
हेही वाचा-Mahakumbh 2025 राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्याला जाणार का?; काँग्रेसने केले स्पष्ट
महाकुंभ (Mahakumbh) दरम्यान होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, उत्तर रेल्वेने जत्रेसाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. महाकुंभासाठी चालवल्या जाणाऱ्या ४ विशेष गाड्यांपैकी तीन लखनौ मार्गे जातील तर एक कानपूर मार्गे जाईल. (Mahakumbh)
विशेष गाड्यांची यादी (Mahakumbh)
- ट्रेन क्रमांक-०४४२० नवी दिल्ली ते प्रयागराज जंक्शन मार्गे नवी दिल्ली-गाझियाबाद-मुरादाबाद-बरेली-लखनऊ-रायबरेली जंक्शन-फाफामऊ जंक्शन १९:०० वाजता
- ट्रेन क्रमांक-०४४२२ नवी दिल्ली ते प्रयागराज जंक्शन मार्गे नवी दिल्ली-गाझियाबाद-मुरादाबाद-बरेली-लखनऊ-रायबरेली-फाफामऊ जंक्शन रात्री ९:०० वाजता
- ट्रेन क्रमांक-०४४२४ आनंद विहार टर्मिनल ते प्रयागराज जंक्शन व्हाया गाझियाबाद-मुरादाबाद-बरेली-लखनऊ-रायबरेली-फाफामऊ २०:०० वाजता
- ट्रेन क्रमांक-०४४१८ नवी दिल्ली-गाझियाबाद-छिप्याना बुजुर्ग-कानपूर-लखनऊ-फपजामऊ-वाराणसी-दीनदयाळ उपाध्याय जंक्शन-पाटलीपुत्र जंक्शन-दरभंगा दुपारी ३:०० वाजता
हेही पहा-
Join Our WhatsApp Community