Millets tablet : भरडधान्यापासून बनवली भुकेची गोळी ; लष्कराला होणार मोठी मदत

118
Millets tablet : भरडधान्यापासून बनवली भुकेची गोळी ; लष्कराला होणार मोठी मदत
Millets tablet : भरडधान्यापासून बनवली भुकेची गोळी ; लष्कराला होणार मोठी मदत

लखनऊ (Lucknow) येथील सीएसआयआर-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टॉक्सिकोलॉजी रिसर्चने (CSIR-Indian Institute of Toxicology Research) ‘आणीबाणीतील आहार’ (Millets tablet) , ‘एनफिट’ व ‘मिल-फिट’ (Mill-fit) नावाच्या गोळ्या तयार केल्या आहेत. देशातील दुर्गम भागात तैनात सैनिकांपर्यंत (Army) रेशनची रसद पुरवणे आव्हानात्मक असते. पूर-भूकंप किंवा वादळात बचाव पक्षासह सामान्य नागरिकांनाही खाण्यापिण्याची पूर्तता होत नाही. अशा स्थितीत केवळ एक गोळी पोषणाची गरज भागवेल. (Millets tablet)

हेही वाचा-दिल्लीतील चेंगराचेंगरीनंतर Mahakumbh साठी आणखी 4 विशेष गाड्यांची घोषणा ; ‘येथून’ धावतील गाड्या

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, या गोळ्या भरडधान्यापासून (मिलेट्स) म्हणजे ज्वारी, बाजरी, राजगिरा, कुटकी कोद्रा इत्यादीद्वारे दोन वर्षांत तयार केल्या आहेत. या गोळ्यांना औषधांप्रमाणे साठवणूक करूनही ठेवता येऊ शकते. आतापर्यंत आणीबाणीत उपयुक्त ठरेल असे कोणतेही कॉम्पॅक्ट सुपरफूड नव्हते. यातूनच भूकेची गोळी ही संकल्पना आली. संकल्पनेपासून संशोधन, चाचणी, प्रोटोटाइप लाँच होण्यापर्यंत दोन वर्षांचा काळ लागला. (Millets tablet)

हेही वाचा-Earthquake in Delhi NCR : भूकंपाच्या धक्क्याने दिल्ली हादरली ; इमारतींच्या आत जोरदार कंपने जाणवताच लोक घाबरुन घराबाहेर

या गोळ्या वेगवेगळ्या भरडधान्यापासून बनवल्या. पोषणावरील संशोधनासोबतच तज्ज्ञांच्या निगराणीत या विशिष्ट पद्धतीने तयार केल्या आहेत. यात शरीरासाठी गरजेचे मॅक्रोन्यूट्रिएंट्स व कार्बोहायड्रेट, प्रथिने, फॅट, मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे जीवनसत्त्वे व खनिजांचे संतुलन राखले आहे. सोबतच आेमेगा-३ फॅटी ॲसिड्सही आहे. त्यामुळे शरीराला स्फूर्तीसह रिकव्हरीही सहज होईल. सामान्य गोळ्यासारखीच ही देखील वजनाने हलकी असेल. शिवाय गोळीला दीर्घकाळ साठवूनही ठेवता येईल. खाण्यासाठी ही गोळी अगदी सोपी असेल. (Millets tablet)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.