मुंबई मेट्रो मार्ग – ५ (Thane-Bhiwandi Metro Line 5) ठाणे- भिवंडी- कल्याण या प्रकल्पाला ३ वर्षे विलंब झाला आहे. मुंबई मेट्रो मार्ग- ५ (Metro 5) ठाणे- भिवंडी- कल्याण ठाणे हा १५ स्थानके असलेला २४.९० किमी लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे. मुंबई मेट्रो मार्ग – ५ ठाणे- भिवंडी- कल्याणचे काम अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर (Afcons Infrastructure) या कंपनीला १ सप्टेंबर २०१९ या दिवशी देण्यात आले होते. सदर काम १ मार्च २०२२ रोजी पूर्ण करणे अपेक्षित होते. आता नवीन डेडलाईन ही ३१ मार्च २०२५ अशी आहे.
(हेही वाचा – प्रवासाला निघण्यापूर्वी आता FASTag बॅलन्स नक्की तपासा; लागू झाले आहेत नवे नियम)
स्थापत्य कामाच्या खर्चात सध्या तरी कोणतीही वाढ झाली नसली, तरी ३ वर्षांची प्रकल्प दिरंगाई हा त्रासदायक आहे. माहिती अधिकारातून ही माहिती उघड झाली आहे. मुंबई मेट्रो मार्ग- ५ ठाणे- भिवंडी- कल्याण या प्रकल्पाचा स्थापत्य कामाचा अपेक्षित खर्च हा ८९८.१९ कोटी इतका आहे. सध्या तरी वाढीव खर्च झालेला नाही. ३ वर्षांची दिरंगाई लक्षात घेता दंडात्मक कारवाई करताना कंत्राटदार आस्थापनाला केवळ २०.८८ लाख इतका दंड आकारण्यात आला आहे.
मेट्रो ५ महत्त्वाचा मार्ग आहे. व्यावसायिक व शासकीय कर्मचारी, तसेच ठाणे (Thane), भिवंडी (Bhiwandi) व कल्याण (Kalyan) परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी हा मेट्रो मार्ग उत्तम सुविधा प्रदान करेल. यामुळे प्रवासाचा वेळ 50 ते 75 टक्क्यांपर्यंत कमी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. (Thane-Bhiwandi Metro Line 5)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community