अंतराळात अडकलेल्या Sunita Williams लवकरच परत येणार; नासाने पाठवले विशेष यान

120

भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) पुढील महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून पुन्हा पृथ्वीवर सुखरूप येणार आहेत. त्यांच्यासह अन्य अमेरिकन अंतराळवीर बूच विलमोर (Butch Willmore) हेही असणार आहेत. या दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्यासाठी नासाने खास प्लान बनवला आहे.

(हेही वाचा – Earthquke in Bihar-Odisha : दिल्लीपाठोपाठ बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण)

गेल्यावर्षी २४ जून रोजी सुनीता विल्यम्स आणि बूच विलमोर स्टारलाईनरमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (International Space Station) गेले होते. तिथे त्यांच्या स्थानकात बिघाड झाल्याने दोघेही ९ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकले आहेत. त्यांची सुकलेली त्वचा आणि कमकुवत शरीर पाहून डॉक्टरांनीही चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एलॉन मस्क यांना बिडेन यांनी अवकाशात सोडलेल्या दोन्ही अंतराळवीरांना लवकर पृथ्वीवर आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार इलॉन मस्क (Elon Musk) यांनी आपल्या ‘स्पेसेक्स’ (SpaceX) संस्थेद्वारे दोघांना परत आणण्याची तयारी सुरू केली.

एलोन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सच्या सहकार्याने नासा हे मिशन पूर्ण करणार आहे. त्यांना आणण्यासाठी ‘ड्रॅगन’ (dragon) नावाचे एक जुने यान पाठविण्यात आले आहे. ‘नासा’ या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने या अंतराळयानाची व्यवस्था केली आहे.12 मार्च रोजी, नासा स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून (Dragon Capsule) क्रू-10 आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पाठवेल. त्यात अंतराळवीर ॲन मॅक्क्लेन, निकोल आयर्स, ताकुया ओनिशी आणि रोसकॉसमॉस हे सहभागी होणार आहेत. त्यानंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना या कॅप्सूलमधून पृथ्वीवर परत आणले जाईल.

नासासह (NASA) जगभरातील सर्व अंतराळ संशोधन संस्थांचे या मोहिमेकडे लक्ष लागलेले आहे. सुनीता विल्यम्स भारतीय वंशाच्या असल्याने भारतीय लोकांना त्यांचा अभिमान आहे आणि या मोहिमेविषयी उत्सुकताही आहे. या दोन्ही अंतराळवीरांचे पृथ्वीवर येणे लांबणार असल्याच्या वृत्तामुळे सर्वत्र काळजीचे वातावरण होते. हे दोन्ही अंतराळवीर केवळ आठ दिवसांच्या मोहिमेसाठी गेले होते. पण सुमारे आठ महिन्यांपासून ते तिथे आहेत.त्या दोघांची प्रकृती सध्या पूर्ण ठणठणीत आहे. सुनीता विल्यम्स आणि बूच विलमोर या दोघांनीही आम्ही खूप छान आहोत, असे कळवले आहे.

सुनीता विल्यम्स या नेव्हीच्या हेलिकाॅप्टर पायलट होत्या, तर विलमोर जेट पायलट होते. सुनीता विल्यम्स ५८ वर्षांच्या असून, सर्वाधिक काळ स्पेसवॉक करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. बूच विलमोर हे ६१ वर्षांचे आहेत. हे दोघे अंतराळवीर सुरक्षित पृथ्वीवर परत येवोत, अशीच साऱ्यांची अपेक्षा आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.