‘ट्रेन द ट्रेनर्स’ उपक्रमाची सुरुवात; ITI प्रशिक्षकांना आधुनिक प्रशिक्षण

78
'ट्रेन द ट्रेनर्स' उपक्रमाची सुरुवात; ITI प्रशिक्षकांना आधुनिक प्रशिक्षण
  • प्रतिनिधी

राज्यात आयटीआय (ITI) (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) प्रशिक्षकांसाठी ‘ट्रेन द ट्रेनर्स’ उपक्रम सोमवारपासून सुरू होत आहे. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते याची औपचारिक सुरुवात होणार आहे.

प्रशिक्षकांसाठी १५ दिवसांचे विशेष ट्रेनिंग

या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व आयटीआय (ITI) प्रशिक्षकांना १५ दिवसांचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणाद्वारे नवीन तंत्रज्ञान, आधुनिक शिक्षण पद्धती आणि कौशल्य विकासावर भर दिला जाईल. प्रशिक्षकांच्या गुणवत्ता सुधारण्यासोबतच विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन मिळेल.

(हेही वाचा – DCM Eknath Shinde : विभागवार भाईगिरी सुरू…)

मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या विकास आराखड्याचा भाग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या १०० दिवसांच्या विकास आराखड्यातील हा महत्त्वाचा उपक्रम आहे. यामुळे राज्यातील कौशल्य प्रशिक्षणाच्या दर्जामध्ये सुधारणा होईल आणि आयटीआय (ITI) प्रशिक्षकांचे ज्ञान अद्ययावत राहील.

प्रशिक्षणासाठी नवीन नियमावली
  • दर तीन वर्षांनी प्रशिक्षकांना अनिवार्य प्रशिक्षण घ्यावे लागणार.
  • उद्योग क्षेत्रातील नव्या संधींनुसार प्रशिक्षकांचे ज्ञान अपग्रेड केले जाणार.
  • आधुनिक तंत्रज्ञान आणि स्मार्ट लर्निंग तंत्राचा वापर वाढवण्यावर भर.
प्रशिक्षकांसाठी मोठी संधी

या उपक्रमामुळे प्रशिक्षणार्थींसोबतच प्रशिक्षकांचाही विकास होणार असून, राज्यातील कौशल्य विकासाच्या क्षेत्रात सकारात्मक बदल घडेल. नवीन कौशल्यांसाठी प्रशिक्षक तयार करण्याचा हा अनोखा उपक्रम भविष्यातही उपयुक्त ठरेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.