Yashasvi Jaiswal Injured : यशस्वी जयस्वाल रणजीचा उपांत्य सामना का खेळत नाही?

Yashasvi Jaiswal Injured : मुंबईचा संघ १७ तारखेपासून उपांत्य फेरीत विदर्भशी झुंजणार आहे.

47
Yashasvi Jaiswal Injured : यशस्वी जयस्वाल रणजीचा उपांत्य सामना का खेळत नाही?
  • ऋजुता लुकतुके

चॅम्पियन्स करंडकासाठीच्या संघातून ऐनवेळी बाहेर पडलेला यशस्वी जयस्वाल त्यानंतर मुंबईचा रणजीतील उपांत्य सामना खेळणार होता. पण, सरावादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे आता तो विदर्भाविरुद्धचा सामना खेळू शकणार नाहीए. मुंबई संघासाठीही हा मोठा धक्का असेल. या दुखापतीनंतर तो नागपूरहून घरी परतणार आहे. शनिवारी उशिरा यशस्वीचा उजव्या पायाचा घोटा दुखावला. त्याला सूज आल्यामुळे सोमवारचा सामना त्याला खेळता येणार नाहीए. पण, मुंबईने यशस्वीऐवजी बदली खेळाडू निवडलेला नाही. आधीच्या सामन्याप्रमाणे आयुष म्हात्रे आणि आकाश आनंद मुंबईच्या डावाची सुरुवात करतील. (Yashasvi Jaiswal Injured)

यशस्वी आधी चॅम्पियन्स करंडकासाठी निवडलेल्या संघाचा भाग होता. पण, ११ फेब्रुवारीला त्याच्या ऐवजी वरुण चक्रवर्तीची निवड करण्याचा निर्णय निवड समितीने घेतला. यशस्वी हा चॅम्पियन्स करंडकासाठी निवडलेल्या राखीव खेळाडूंपैकी एक आहे. पण, यंदा राखीव खेळाडू संघाबरोबर प्रवास करणार नाहीएत. यशस्वी आता मुंबईत त्याच्या दुखऱ्या घोट्यावर उपचार घेणार आहे. (Yashasvi Jaiswal Injured)

(हेही वाचा – Thane-Bhiwandi Metro Line 5 च्या कामात ३ वर्षांची दिरंगाई; कंत्राटदार आस्थापनाला ठोठावला दंड)

यशस्वी भारताकडून कसोटी आणि टी-२० सामने नियमितपणे खेळतो. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याला एकदिवसीय सामन्यातही पदार्पणाची संधी मिळाली. यात त्याने १५ धावा केल्या. त्यानंतर मात्र उर्वरित दोन सामन्यांत शुभमन आणि रोहित आघाडीला खेळले. यंदाच्या हंगामात यशस्वी फक्त एकच रणजी सामना खेळला आहे. जम्मू व काश्मीर विरुद्धचा सामना मुंबईने गमावला होता. या सामन्यात मुंबईकडून रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे हे भारतीय संघातील खेळाडू खेळले होते. (Yashasvi Jaiswal Injured)

या पराभवामुळेच मुंबईचा बाद फेरीतील प्रवेशही अनिश्चित झाला होता. पण, अखेर शेवटच्या सामन्यात मेघालयाचा पराभव करत मुंबईने बाद फेरी गाठली आणि त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीतही त्यांनी हरियाणाचा निर्णायक पराभव केला. दुसरीकडे विदर्भाचा संघ या हंगामात चांगलाच फॉर्मात आहे. मुंबईकडे अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि शार्दूल ठाकूर हे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. पण, विदर्भाने यंदा ८ पैकी त्यांचे ७ साखळी सामने जिंकले आहेत. तर उपांत्यपूर्व सामन्यातही तामिळनाडूचा त्यांनी १९० धावांनी पराभव केला. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर १७ फेब्रुवारीपासून हा सामना रंगणार आहे. गेल्या हंगामात रणजीचा अंतिम सामना याच संघादरम्यान झाला होता आणि यात मुंबईने विजय मिळवला होता. (Yashasvi Jaiswal Injured)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.