महाबळेश्वरमध्ये (Mahabaleshwar) पर्यटकांची नेहमीच गर्दी असते, त्यात विकेंडला रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे दिवस सुरू आहेत. वाहतूक कोंडी (traffic) पाहून एका विद्यार्थ्याने चक्क पॅराग्लायडींग (paragliding) करत परीक्षा केंद्र (exam center ) गाठले आहे. (Mahabaleshwar)
हेही वाचा-कामाच्या ठिकाणी वरिष्ठांनी झापणे हे गुन्हेगारी कृत्य नाही ; Supreme Court चा निर्वाळा
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा देणारा हा विद्यार्थी बी.कॉम प्रथम वर्षात शिकणारा विद्यार्थी असून तो हॅरिसन फॉली पॉइंटवर स्वत:चं ऊसाच्या रसाचं दुकान आणि ज्युस सेंटर चालवतो. महाबळेश्वरमधील पाचगणीपासून (Pachgani) 5 किमी अंतरावर हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. (Mahabaleshwar)
हेही वाचा-NICB Scam प्रकरणी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकाला केली अटक
सोशल मीडियावर सध्या या विद्यार्थ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून महाबळेश्वरमधील हॅरिसन फॉली पॉइंट येथून पसारनी घाट सेक्शन पर्यंत या विद्यार्थ्याने पॅराग्लायडिंगाने प्रवास करत परीक्षा केंद्र गाठलं. घाटातून कारने प्रवास करायला वेळ लागेल म्हणून विद्यार्थ्याने हा निर्णय घेतला. (Mahabaleshwar)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community