Champions Trophy 2025 : पाकच्या मैदानांवर भारतीय तिरंगाच नसल्यामुळे नवीन वाद सुरू

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकासाठी स्टेडिअमवर सर्व सहभागी देशांचे ध्वज असणं बंधनकारक आहे.

98
Champions Trophy 2025 : भारताचा ध्वज न लावण्याच्या प्रकरणावर पाक क्रिकेट मंडळाची सारवासारव
  • ऋजुता लुकतुके

चॅम्पियन्स करंडकासाठी सज्ज असलेल्या कराचीतील नॅशनल स्टेडिअमवर स्पर्धेत सहभागी इतर संघांचे राष्ट्रध्वज फडकवण्यात आले आहेत. पण, यात भारतीय तिरंगा नसल्यामुळे आता नवीन वादाला सुरुवात झाली आहे. येत्या १९ तारखेला याच मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन सोहळा होणार आहे. त्यानंतर पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड हा पहिला सामना होईल. पण, आयसीसीची मोठी स्पर्धा असताना पाकिस्तानने सर्व सहभागी देशांचे ध्वज लावण्याचा दंडक पाळलेला दिसत नाही. तसे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा – अंतराळात अडकलेल्या Sunita Williams लवकरच परत येणार; नासाने पाठवले विशेष यान)

भारतीय तिरंगा कराचीतील नॅशनल स्टेडिअमवर का नाही याचं अधिकृत स्पष्टीकरण आयसीसीकडून देण्यात आलेलं नाही. पण, भारत आपले सर्व सामने दुबईत खेळणार असल्यामुळे असं झालं असावं. चॅम्पियन्स करंडकाचे सामने कराची, रावळपिंडी आणि लाहोर इथं होणार आहेत. कराचीत भारत वगळता पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया तसंच दक्षिण आफ्रिका संघांचे सामने होणार आहेत आणि ते ध्वजही इथं फडकताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहूया, (Champions Trophy 2025)

(हेही वाचा – ‘ट्रेन द ट्रेनर्स’ उपक्रमाची सुरुवात; ITI प्रशिक्षकांना आधुनिक प्रशिक्षण)

भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडकासाठी पाकिस्तानला जायला नकार दिला होता. त्यानंतर आयसीसीने या स्पर्धेसाठी हायब्रीड मॉडेलचा तोडगा काढला. त्यानुसार, भारताचे सामने दुबईत होणार आहेत. अगदी भारत-पाक हा पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचा सामनाही दुबईतच २३ फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळेच भारतीय ध्वज कराचीत नसावा असा एक अंदाज आहे. चॅम्पियन्स करंडकात आधीच्या एकदिवसीय विश्वचषकातील पहिले ८ संघ सहभागी होतात. यंदा ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघांना चॅम्पियन्स करंडकात प्रवेश मिळाला आहे. वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेचे संघ स्पर्धेसाठी पात्र होऊ शकले नाहीत. (Champions Trophy 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.