मुंबई प्रतिनिधी
राज्याचा सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प (Budget 2025) १० मार्च रोजी विधिमंडळात सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेसाठी दोन दिवस आणि विभागनिहाय मागण्यांवरील चर्चेसाठी पाच दिवस निश्चित करण्यात आले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget session) पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या सादर केल्या जातील, त्यावर दोन दिवस चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील. (Budget 2025)
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session of the Legislature) ३ मार्चपासून मुंबईत सुरू होणार असून, त्यासाठी तीन आठवड्यांचे तात्पुरते कामकाज निश्चित करण्यात आले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या संयुक्त बैठकीत राज्यपालांचे अभिभाषण होईल. या अभिभाषणावर ४ आणि ५ मार्च रोजी चर्चा केली जाईल. त्यानंतर ७ मार्च रोजी पुरवणी विनियोजन विधेयक सादर केले जाईल, तर ८ आणि ९ मार्च रोजी अधिवेशनाला सुट्टी राहील.
(हेही वाचा – Shivsena आमदारांच्या सुरक्षेत आता केवळ एकच सुरक्षारक्षक असणार; आमदारांमध्ये नाराजी)
दुसऱ्या आठवड्यात, १० मार्चला राज्याचा अर्थसंकल्प (Budget) सादर केला जाईल. त्यानंतर ११ आणि १२ मार्च रोजी अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा होईल. १४ मार्चला धुलीवंदनाचा सण असल्याने अधिवेशनाला सुट्टी राहील, तर १५ आणि १६ मार्च हे शनिवार आणि रविवार असल्याने कामकाज होणार नाही.
(हेही वाचा – उपहारगृह, हॉटेलमधील Tandoor च्या वापरात जळावू लाकडांचा वापर बंद; BMC ने दिली २५ जुलै २०२५ पर्यंतची मुदत)
१७ ते २१ मार्च दरम्यान अर्थसंकल्पातील विभागवार मागण्यांवर चर्चा केली जाईल तसेच इतर शासकीय कामकाजही पार पडेल. अधिवेशनाचा पुढील कार्यक्रम आणि महत्त्वाच्या निर्णयांवर सगळ्यांचे लक्ष राहणार आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community