काँग्रेस नेते Sam Pitroda म्हणतात, चीन भारताचा शत्रू नाही; भाजपाची टीका

चीन सगळीकडे आहे, चीन उदयास येत आहे, आपल्याला हे ओळखावे लागेल आणि समजून घ्यावे लागेल, असे Sam Pitroda यांनी म्हटले आहे.

88
काँग्रेस नेते Sam Pitroda म्हणतात, चीन भारताचा शत्रू नाही; भाजपाची टीका

काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि गांधी कुटुंबाचे जवळचे सहकारी सॅम पित्रोदा (Sam Pitroda) पुन्हा एकदा बरळले आहेत. चीन भारताचा शत्रू नाही. चीनकडून (China) येणारा धोका अनेकदा अतिशयोक्तीपूर्ण असतो. भारताने चीनला आपला शत्रू मानणे थांबवावे, असे संतापजनक उद्गार पित्रोदा यांनी काढले आहेत. वृत्तसंस्था आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

सॅम पित्रोदा यांनी पुढे म्हटले आहे की, चीनला (China) शत्रू मानण्याऐवजी त्यांचा आदर केला पाहिजे. चीनकडून भारताला कोणता धोका आहे, हे मला समजत नाही. आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. भारताला चीनबद्दलचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. आपला दृष्टिकोन पहिल्या दिवसापासूनच संघर्षाचा राहिला आहे. यामुळे शत्रुत्व निर्माण होते. मला वाटतं आपल्याला ही पद्धत बदलायला हवी. हे कोणासाठीही चांगले नाही. चीन सगळीकडे आहे, चीन उदयास येत आहे, आपल्याला हे ओळखावे लागेल आणि समजून घ्यावे लागेल.

(हेही वाचा – ऑलिम्पिक विजेती नेमबाज Manu Bhaker विषयी तुम्हाला ‘हे’ माहिती आहे का ?)

काँग्रेसने याविषयी स्पष्टीकरण देत, हे विचार काँग्रेसचे नाहीत, असे स्पष्ट केले आहे.

पित्रोदा यांच्या विधानावर भाजप (BJP) आक्रमक झाला आहे. राज्यसभा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषदेत सांगितले की, पित्रोदा यांनी काँग्रेस पक्षाच्या चीनसोबतच्या कराराचा उघडपणे पर्दाफाश केला आहे. गंभीर गोष्ट अशी आहे की पित्रोदा यांनी जे म्हटले आहे ते भारताच्या ओळखीला, मुत्सद्देगिरीला आणि सार्वभौमत्वाला खोलवर आघात करणारे आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी परदेशातही अशी अनेक विधाने केली आहेत. काही काळापूर्वी, त्यांच्या परदेश दौऱ्यात, राहुल गांधी म्हणाले होते की चीनने बेरोजगारीची समस्या खूप चांगल्या प्रकारे सोडवली आहे. गलवानमध्ये आपले २० सैनिक शहीद झाले आणि त्यानंतर जर तुमचे परराष्ट्र अध्यक्ष (सॅम पित्रोदा, Sam Pitroda ) अशी भाषा बोलत असतील तर ते निंदनीय आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.