सोमवारी कॅनडामध्ये भीषण विमान अपघात झाला. कॅनडाच्या (Canada) टोरंटो इथे असणाऱ्या पियर्सन विमानतळावर ८० प्रवासी असलेल्या विमानाचा भीषण अपघात झाला. बर्फाने झाकलेल्या धावपट्टीवर विमान लँड होताच ते अचानक उलटले आणि एका क्षणात ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या अपघातामध्ये १७ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. (Toronto Plane Crash)
(हेही वाचा – ऑलिम्पिक विजेती नेमबाज Manu Bhaker विषयी तुम्हाला ‘हे’ माहिती आहे का ?)
सोमवारी दुपारच्या सुमारास हे विमान मिनियापोलिसहून टोरंटो येथे येत होते. या विमानात 80 प्रवासी होते. पील क्षेत्रातील पॅरामेडिक अधिकाऱ्याच्या माहितीनुसार या अपघातानंतर काही तास ही धावपट्टी बंदच ठेवण्यात आली होती. परिस्थिती नियंत्रणात आणत उलटे पडलेले विमान तिथून हटवेपपर्यंत सेवा विस्कळीत झाली.
अती हिमवृष्टीमुळं टोरंटोमध्ये अनेक विमानसेवा प्रभावित झाल्या होत्या. याचदरम्यान या विमानतळावरून प्रवाशांची ये-जा वाढणं अपेक्षित असून, हिमवादळसदृश वातावरण यास परिस्थितीला कारणीभूत आहे, असे मानले जात आहे. कॅनडा परिवहन विभाग आणि डेल्टा एअरलाईन्सच्या माहितीनुसार, ‘फ्लाइट 4819’ हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले असून, प्रवाशांचे हित केंद्रस्थानी ठेवत तातडीने त्यांच्यापर्यंत आवश्यक मदत पोहोचवण्यात आली आहे. (Toronto Plane Crash)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community