सर्वांच्या सहकार्यामुळे गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेवर नियंत्रण प्राप्त करणे शक्य झाले आहे. मात्र कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी सर्वांकडून अधिक जबाबदार वर्तन अपेक्षित असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. युवकांमध्ये कौशल्य विकास व महिला सक्षमीकरण या क्षेत्रात कार्य करणाऱ्या साई लीला फाउंडेशन या संस्थेच्या वतीने कोरोना काळात प्रत्यक्ष क्षेत्रात कार्य करणाऱ्या ३० कोरोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते सोमवारी, २ जुलै रोजी राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
(हेही वाचा : वाहतूक विभागाचा ‘हा’ खर्च मुंबई महापालिका उचलते)
कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री व गोरेगाव येथील आमदार विद्या ठाकूर, लोढा फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजू लोढा, साई लीला फाउंडेशनच्या अध्यक्षा रश्मी उपाध्याय, विश्वस्त महेश शेट्टी आदि उपस्थित होते. जयपॅन इंडस्ट्रिचे जय नारायण अग्रवाल, इंडियन फिल्म्स एंड टीव्ही डिरेकटर्स असोसिएशनचे सचिव कुकू कोहली, ईंडीयन मोशन पिक्चर्स असोसिएशनच्या सुषमा शिरोमणी, सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शेफाली केशरवानी, केईएम हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. धीरज कुमार, डॉ. सिद्धनाथ दुबे, डॉ. प्रज्ञा कुलकर्णी, राज श्रीवास्तव, मिहीर भोईर, प्राध्यापक प्रशांत नवाथे, आशा सेविका उज्वला नेमन आणि उषा खराडे, आरोग्य सेविका प्रियंका वाधवा, सीमा ओटेकर, नीता काळडोके, वर्षा गरवारे, उर्वशी बिहारे व उन्नती तोडणकर, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी रवी सोलंकी, वॉर्डबॉय शंकर मुंसे, सनदी लेखापाल अवधेश पटेल, इम्रान गफ्फार पिराणी, ताराबाई राजवंशी, प्रसाद कदम, संतोष वासुदेव नारकर, महेश पवार, कमलेश सदानंद मौर्य, लक्ष्मण नाडर, अरविंद दुबे यांचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Join Our WhatsApp Community