Crime : कुर्ल्यात शाळेपासून जवळच्या अंतरावर मटका जुगाराचे अड्डे; पालकांनी केली कारवाईची मागणी

205
Crime : कुर्ल्यात शाळेपासून जवळच्या अंतरावर मटका जुगाराचे अड्डे; पालकांनी केली कारवाईची मागणी
  • प्रतिनिधी

कुर्ला पश्चिम रेल्वे स्थानक रोड वर असलेल्या मुंबई महानगर शाळा तसेच इंग्रजी माध्यमाच्या एका खाजगी शाळेपासून जवळच्या अंतरावर असलेल्या मटका जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करून हा अड्डा बंद करण्याची मागणी विद्यार्थ्यांचे पालक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. (Crime)

कुर्ला पश्चिम बस स्थानक या ठिकाणी असलेल्या नशेमन हॉटेल जवळ मटका जुगाराचा अड्डा असून ‘सलीम पॅटिस’ नावाचा व्यक्ती हा अड्डा चालवत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या अड्ड्यावर मोठ्या प्रमाणात जुगाऱ्यांचा वावर असतो. त्याचप्रमाणे नशाबाज मंडळी देखील या परिसरात मोठ्या प्रमाणात नशा करताना आढळून येतात. या जुगाराच्या अड्ड्यापासून हाकेच्या अंतरावर मुंबई महानगरपालिकेची तसेच इंग्रजी माध्यमाची खाजगी शाळा असल्यामुळे शाळेत येताना जाताना विद्यार्थी आणि पालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे काही पालकांचे म्हणणे आहे. (Crime)

(हेही वाचा – बिहारमधील आरा स्टेशनवर प्रवाशांकडून Sampoorna Kranti Express ची तोडफोड)

शाळेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या जुगाराच्या अड्ड्यामुळे परिसरात नशेबाज, जुगाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्यामुळे विद्यार्थी पालकांना शाळेत येताना जाताना त्याचा त्रास होत असतो असे काही पालकांचे म्हणणे आहे. हातावर पोट असणारे अनेक मजूर, कामगार वर्ग या ठिकाणी मटका जुगार खेळण्यासाठी येत असतात यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे. या जुगाराच्या अड्ड्याची कुर्ला पोलिसांना माहिती असून देखील या अड्ड्यावर नावापुरती कारवाई केली जाते, त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा हे जुगाराचे अड्डे मोठ्या जोमात सुरू होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. (Crime)

कुर्ला मार्केट मनपा एल विभागाच्या शेजारी असलेल्या लक्ष्मणराव यादव मंडई बस थांब्याच्या मागे देखील मटका जुगाराचे आकडे घेणारे तसेच, आकडा लावणाऱ्याची संख्या मोठी असून पोलिसांनी अनेक वेळा कारवाई करून देखील हे अड्डे बंद होत नसल्यामुळे लोकांकडून आक्स्चर्य व्यक्त केले जात आहे. (Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.