मध्यप्रदेशातील भिंड येथे मंगळवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात (Accident) 5 जणांचा मृत्यू झाला. तर 21 जण गंभीर जखमी झालेत. अपघाताला बळी पडलेले सर्वजण एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आले होते. एका अनियंत्रित भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेमुळे हा भीषण अपघात (Accident) घडला. दरम्यान अपघातात मृत्यूमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती पुढे आली आहे.
(हेही वाचा – Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी टीम इंडियाने जर्सीवर छापले पाकिस्तानचे नाव)
यासंदर्भातील माहितीनुसार भिंड जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी गिरीश नारायण हे त्यांच्या कुटुंबासह जवाहरपुरा येथे त्यांच्या बहिणीच्या घरी लग्न कार्यासाठी गेले होते. सकाळी त्याच्या कुटुंबातील काही सदस्य भिंड शहरातील भवानीपुरा येथील त्यांच्या घरी परतण्याची तयारी करत होते. भात समारंभानंतर घरी परतणाऱ्या लोकांना रस्त्यावरून जाणाऱ्या मालवाहू गाडीत बसवण्यात येत होते. त्याच्या मागे दुचाकीवर कुटुंबातील 3 सदस्यही उभे होते. त्याचवेळी एका भरधाव ट्रकने गाडीला धडक दिली. या अपघातात (Accident) 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर सुमारे 21 जण जखमी झाले.
(हेही वाचा – बिहारमधील आरा स्टेशनवर प्रवाशांकडून Sampoorna Kranti Express ची तोडफोड)
यासंदर्भात भिंडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघातातील जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे भिंड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तिथे डॉक्टरांनी आणखी 2 जणांना मृत घोषित केले. या घटनेने लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आलेल्या कुटुंबावर शोककळा पसरली. 5 जणांचा मृत्यू आणि 21 जण जखमी झाल्यानंतर, मृतांच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी रस्ता रोखून धरला होता. (Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community