-
ऋजुता लुकतुके
विराट कोहलीने (Virat Kohli) इंग्लंडविरुद्घ तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ५२ धावा करून आपल्या फॉर्मची चुणूक दाखवून दिली आहे. पण, चाहत्यांना त्याच्याकडून अपेक्षा आहे ती सातत्यपूर्ण खेळीची आणि त्याच्या बॅटमधून चॅम्पियनला साजेशा धावा निघाव्यात अशीच सगळ्यांची इच्छा आहे. भारतीय संघाला चॅम्पियन्स करंडक जिंकायचा असेल तर त्याची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. अशावेळी त्याचे दिल्लीतील लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा विराटच्या (Virat Kohli) बाजूने उभे राहिले आहेत. ‘चॅम्पियन्स करंडकात विराट चॅम्पियनसारखी कामगिरी करेल,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
(हेही वाचा – Sheikh Hasina यांची घोषणा; म्हणाल्या, बांगलादेशात पुन्हा जाणार; प्रत्येक हुतात्म्याचा बदला घेणार)
‘काही सामने मनासारखे गेले नाहीत, म्हणून खेळाडू लगेच बिनकामाचा ठरत नाही. त्याचा आधीचा रेकॉर्ड पाहिला तर विराट काय चीज आहे ते समजेल आणि फॉर्ममध्ये परतण्यासाठी त्याला फक्त एका चांगल्या सामन्याची गरज आहे. ते कधीही होऊ शकतं. चॅम्पियन्स करंडकात तो चॅम्पियनसारखाच खेळेल,’ असं शर्मा एएनआय वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले. (Virat Kohli)
(हेही वाचा – Love Jihad : पाकिस्तानचा आणखी एक क्रिकेटपटू भारतीय हिंदू मुलीशी करणार विवाह)
इंग्लंडविरुद्ध ३ एकदिवसीय सामन्यांत विराट शेवटचे दोन सामने खेळला आणि यात त्याने अनुक्रमे ५ आणि ५२ धावा केल्या. आता चॅम्पियन्स करंडकात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. ‘भारतीय संघही चांगल्या तयारीत दिसत आहे आणि संभाव्य दावेदारांमध्ये भारताचं नाव नक्कीच वर आहे,’ असंही शर्मा यांनी बोलून दाखवलं. जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स करंडकात खेळू शकणार नसला तरी भारतीय गोलंदाजीतही धार आहे आणि हर्षित राणाही चांगली कामगिरी करू शकतो असा विश्वासही राजकुमार शर्मा यांनी व्यक्त केला. (Virat Kohli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community