-
ऋजुता लुकतुके
चॅम्पियन्स करंडक स्पर्धा दोन दिवसांवर आलेली असताना बीसीसीआयने भारतीय संघातील खेळाडूंचे नवीन जर्सीतील फोटो प्रसिद्ध केले आहेत. भारतीय संघ २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. त्यापूर्वी विराट कोहली, शुभमन गिल, रोहित शर्मा, रिषभ पंत आणि मोहम्मद शमी यांचे फोटो बीसीसीआयने ट्विट केले आहेत. ‘आज घेतलेले हे फोटो किती चांगले आहेत नाही!’ असं म्हणत बीसीसीआयने हे फोटो प्रसिद्ध केले आहेत. हे ट्विट लगेच व्हायरल झालं आहे आणि लोकांनी भारतीय संघाला शुभेच्छा द्यायला सुरुवातही केली आहे.
भारतीय संघ आपला पहिला सामना बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. तर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धचा महत्त्वाचा सामना २३ फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतर भारताचा शेवटचा साखळी सामना ३ मार्चला न्यूझीलंडविरुद्ध होईल.
(हेही वाचा – दलाल स्ट्रीट आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवळील चौकात Jawaharlal Darda यांचा बसवणार अर्धपुतळा)
These pics from today 📸
How good 🤌🏻#TeamIndia | #ChampionsTrophy pic.twitter.com/yM50ArMIj5— BCCI (@BCCI) February 17, 2025
या स्पर्धेत स्टार तेज गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे खेळत नाहीए. त्याच्या जागी हर्षित राणा भारतीय संघात आला आहे. तर ऐनवेळी संघात बदल करून भारताने यशस्वी जयस्वालच्या जागी वरुण चक्रवर्तीला खेळवण्याचा निर्णयही घेतला आहे. इंग्लंडविरुद्धची मालिका ३-० ने जिंकून भारतीय संघाने आपली तयारी तर दाखवून दिली आहे. पण, चॅम्पियन्स करंडक ही महत्त्वाची स्पर्धा असणार आहे आणि तिथे भारताकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा असेल.
(हेही वाचा – Champions Trophy 2025 : दुबईत भारतीय संघाची आतापर्यंतची कामगिरी कशी आहे?)
— BCCI (@BCCI) February 17, 2025
चॅम्पियन्स करंडकासाठी भारतीय संघाने ५ फिरकीपटूंना संघात स्थान दिलं आहे. तर मोहम्मद शमीही दीड वर्षांच्या विश्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला आहे. इंग्लंडविरुद्धची मालिका ही त्यानंतर त्याची पहिली आंतरराष्ट्रीय मालिका होती. चॅम्पियन्स करंडकासाठी भारतीय संघ पाहूया,
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, रिषभ पंत, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद शमी व हार्दिक पांड्या
हेही पहा –
Join Our WhatsApp Community