मुंबई प्रतिनिधी
शिवसेना नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “सत्तेच्या खुर्चीसाठी २०१९ मध्येच ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना, हिंदुत्वाला आणि शिवसेनेला डॅमेज केले, ते आता आभाळ फाटल्यावर त्याला कुठे कुठे ठिगळ लावणार?” असा घणाघाती टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरें यांना लगावला. (DCM Eknath Shinde)
उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षातील परिस्थिती सावरण्यासाठी बोलावलेल्या बैठकीवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र टीका केली आणि “महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) अजेंडा हा केवळ खुर्चीसाठी होता, तर महायुतीचा (Mahayuti) अजेंडा सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे आहे,” असे स्पष्ट केले.
(हेही वाचा – दलाल स्ट्रीट आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवळील चौकात Jawaharlal Darda यांचा बसवणार अर्धपुतळा)
महायुतीचा विकास अजेंडा आणि वॉर रूमचा मुद्दा
राज्यातील पायाभूत सुविधा आणि प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी केवळ एकच वॉर रूम कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यांचा आढावा घेण्यासाठी समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला असून तो वॉर रूमशी संलग्न आहे. त्यामुळे महायुतीमध्ये कोल्ड वॉर (Cold War) नाही, तर महाराष्ट्राच्या विकासविरोधी लोकांशी युद्ध सुरू आहे,” असा सणसणीत टोलाही उपमुख्यमंत्री शिंदेंनी लगावला.
वैद्यकीय सहायता कक्ष आणि कामगारांसाठी महत्त्वाचे निर्णय
शासन निर्णय ३१ ऑक्टोबर २०२३ नुसारच उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कार्यान्वित करण्यात आल्याची माहितीही उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिली. राज्यातील बंद पडलेल्या किंवा दिवाळखोरीत गेलेल्या कारखान्यांच्या कामगारांना थकीत वेतन मिळावे, यासाठी MIDC कडून स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिल्याचेही त्यांनी सांगितले.
(हेही वाचा – Champions Trophy 2025 : दुबईत भारतीय संघाची आतापर्यंतची कामगिरी कशी आहे?)
“शिवसेना बाळासाहेब आणि आनंद दिघेंच्या विचारांवर चालणारा पक्ष”
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “शिवसेना (Shivsena) हा बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. हा कार्यकर्त्यांना बळ देणारा पक्ष आहे, ‘तुम लढो, हम कपडा संभालता है’ अशा विचारांचा नाही!” अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरे यांना मार्मिक टोला लगावला. उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “आज शिवसेनेत मोठ्या संख्येने लोक प्रवेश करत आहेत. आम्ही त्यांचे स्वागत करतो. पण ज्या नेत्यांना लोक सोडून जात आहेत, त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे.”
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community