फेब्रुवारीच्या अखेरीस रवींद्र नाट्य मंदिरांची तिसरी घंटा वाजणार; Minister Ashish Shelar यांनी दिले मुंबईकरांना विशेष आमंत्रण

२८ फेब्रुवारीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा

217
Apple iPhone SE 4 : ॲपलचा सगळ्यात स्वस्त एसई ४ होणार लाँच, टीम कूकनी दिले संकेत
Apple iPhone SE 4 : ॲपलचा सगळ्यात स्वस्त एसई ४ होणार लाँच, टीम कूकनी दिले संकेत
मुंबई प्रतिनिधी 
मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेले रवींद्र नाट्यमंदिर (Rabindra Natya Mandir) आणि पु. ल. देशपांडे कला अकादमी (Pu. L. Deshpande Kala Academy) नव्या स्वरूपात २८ फेब्रुवारी २०२५ पासून नाट्यरसिक आणि कलाप्रेमींच्या सेवेत दाखल होत आहे. या अत्याधुनिक संकुलाच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा भव्य उद्घाटन सोहळा संध्याकाळी ६ वाजता पार पडणार असून, यासाठी सर्व मुंबईकरांना उपस्थित राहण्याचे विशेष आमंत्रण सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले आहे. (Minister Ashish Shelar)
नवीन बोधचिन्हाचे अनावरण
या उद्घाटन सोहळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर, आज मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव व सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उपसचिव नंदा राऊत, तसेच अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर उपस्थित होते.
नवीन बोधचिन्ह लोककला, अभिजात कला, दृश्यात्मक कला आणि दृकश्राव्य कला अशा सर्व कलांचे प्रतिबिंब दर्शवणारे आहे. हे बोधचिन्ह अकादमीच्या नवनिर्मित संकल्पनेचे प्रतीक असून, कलाक्षेत्राच्या विविध अंगांचा योग्य तो समन्वय साधते, असे मंत्री ॲड. शेलार यांनी यावेळी सांगितले.

(हेही वाचा – Virat Kohli : ‘चॅम्पियन्स करंडकात विराट चॅम्पियनसारखी फलंदाजी करेल’ – विराटचे प्रशिक्षक)

कलाक्षेत्राच्या सर्व गरजा पूर्ण करणारे संकुल
मंत्री ॲड. शेलार (Minister Ashish Shelar) यांनी नमूद केले की, पु.ल. देशपांडे कला अकादमीने स्थापनेपासून अनेक कलाकार आणि कलाप्रेमी घडवले आहेत. ही संस्था नवोदित आणि कसलेल्या कलाकारांसाठी (Artist Acadamy) एक हक्काचे व्यासपीठ ठरणार आहे.
कलाक्षेत्रात शिक्षण, सादरीकरण, संवर्धन आणि रोजगार निर्मिती या सर्व गरजा एकाच ठिकाणी पूर्ण करणारी ही अकादमी आता अत्याधुनिक स्वरूपात उपलब्ध होणार आहे,” असे सांगून त्यांनी पुढील महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले 
  • २० वेगवेगळे प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम लवकरच सुरू होणार.
  • नवोदित कलाकारांना विशेष संधी उपलब्ध होणार.
  • कलाक्षेत्राच्या प्रत्येक अंगाची वाढ होईल, यासाठी विशेष सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
रवींद्र नाट्यमंदिर आणि अकादमीतील नवी वैशिष्ट्ये
रवींद्र नाट्यमंदिर आणि पु. ल. देशपांडे कला अकादमी संकुलामध्ये
  • 2 लघु नाट्यगृहे,
  • 5 प्रदर्शन दालने,
  • 15 तालीम दालने या सुविधा उपलब्ध आहेत.
“नाट्य, संगीत, चित्रपट आणि विविध कला सादरीकरणासाठी येथे आधुनिक तंत्रज्ञानासह सुविधा उभारण्यात आल्या आहेत,” असेही मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.

(हेही वाचा – Virat Kohli : ‘चॅम्पियन्स करंडकात विराट चॅम्पियनसारखी फलंदाजी करेल’ – विराटचे प्रशिक्षक)

अत्याधुनिक ध्वनी व अंतर्गत सजावट
नाटक आणि मराठी चित्रपट यासाठी आवश्यक असणाऱ्या अत्याधुनिक ध्वनी प्रणाली आणि अंतर्गत सजावटीवर विशेष भर देण्यात आला आहे. त्यामुळे हे संकुल कलाकार, तंत्रज्ञ आणि कलाप्रेमींसाठी एक उत्तम स्थान ठरणार आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.