मुंबई –
‘स्ट्रॉबेरी क्विक’ (Strawberry Quick) नावाच्या अदृश्य ड्रग्सच्या व्हायरल मेसेजने पालकांमध्ये खळबळ उडवुन दिली आहे. ‘स्ट्रॉबेरी क्विक’ नावाचा अमली पदार्थ (Drugs) स्कुल आणि कॉलेज परिसरात विकले जात असून पालकांना सतर्क राहावे असे आवाहन या व्हायरल मेसेजमध्ये करण्यात येत आहे. शाळा,कॉलेजस प्रशासन आणि पालकांमध्ये या व्हायरल मेसेजमुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Strawberry Quick)
काय आहे मेसेजची सत्यता…
या व्हायरल मेसेजचे (Viral message) सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी ‘हिंदुस्थान पोस्ट’ (Hindusthan Post) तपास यंत्रणेतील काही पोलीस अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता “आमच्याकडे स्ट्रॉबेरी क्विक या ड्रग्स संदर्भात अद्याप पर्यत कुठलीही तक्रार नोंदवली गेलेली नाही, किंवा ‘स्ट्रॉबेरी क्विक’ नावाचे ड्रग्स अस्तित्वात आहे का? याबाबत आम्हाला शंका आहे, पालक आणि शाळा कॉलेज (College) प्रशासनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी कोणीतरी हा मेसेज तयार करून सोशल मीडिया, व्हाट्सएपवर व्हायरल केला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांनी,पालकांनी आणि शाळा कॉलेज प्रशासनाने घाबरून जाऊ नये आणि संशयास्पद काहीही आढळुन आल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन एका वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे.
काय आहे व्हायरल मेसेज ?
ही माहिती सर्वांना कळली पाहिजे, जरी तुमची मुले शाळेत शिकत नसली तरीही! सध्या शाळांमध्ये एक अतिशय धोकादायक गोष्ट घडत आहे, ज्याबद्दल आपल्याला सतर्क राहणे आवश्यक आहे. ‘स्ट्रॉबेरी क्विक’ नावाचा एक नवीन प्रकारचा अमली पदार्थ (ड्रग) आढळून आला आहे. हा एक प्रकारचा क्रिस्टल मेथ आहे, जो स्ट्रॉबेरी पॉप रॉक्स या गोड पदार्थासारखा दिसतो आणि त्याला स्ट्रॉबेरीसारखा वास येतो. हा शालेय परिसरात मुलांना देण्यात येत आहे, आणि मुले त्याला खरेच गोड समजून खात आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर बनत असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. हा पदार्थ फक्त स्ट्रॉबेरीच नाही तर चॉकलेट, पीनट बटर, कोला, चेरी, द्राक्ष आणि संत्रा अशा वेगवेगळ्या फ्लेवर्समध्येही आढळतो. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना सतर्क राहण्यास सांगावे.
➡ अनोळखी व्यक्तींकडून कोणतेही गोड पदार्थ किंवा चॉकलेट स्वीकारू नये.
➡ कोणत्याही मित्राने देखील असे काही पदार्थ दिल्यास, ते खाण्याऐवजी त्वरित शिक्षक, मुख्याध्यापक किंवा इतर जबाबदार व्यक्तींना द्यावे.
➡ हा संदेश शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सर्व पालक आणि शिक्षक जागरूक होतील.
(हेही वाचा – Champions Trophy 2025 : भारताचा ध्वज न लावण्याच्या प्रकरणावर पाक क्रिकेट मंडळाची सारवासारव)
सावध राहा, सुरक्षित राहा!
‘स्ट्रॉबेरी क्विक’ या व्हायरल मेसेचा उगम मुंबईतील बोरिवली येथून झाला आहे, बोरिवलीतील माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी (Former corporator Shivanand Shetty) यांनी हा मेसेज तयार करून सर्वात प्रथम बोरिवली परिसरातील व्हाट्सएपच्या ग्रुप वर व्हायरल करण्यात आला, तेथून हा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मुंबईसह ठाणे जिल्हा नवीमुंबई सह अनेक महानगरात हा मेसेज व्हायरल होऊन शाळा प्रशासन देखील या मेसेजने हादरले असून शाळा प्रशासनाकडून हा मेसेज पालकांना व्हायरल करण्यात येत आहे. या व्हायरल मेसेजची अनेकांनी रिल्स करून सोशल मीडियावर त्याचे व्हिडीओ पोस्ट केले आहे. ठाण्यातील दोन पोलीस अंमलदारांनी हा मेसेज व्हिडीओ मध्ये रूपांतर करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हायरल मेसेज तयार करणारे माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांच्याकडे हिंदुस्थान पोस्टने संपर्क साधला असता, त्यांनी हा मेसेज त्यांनीच तयार केल्याचे कबूल केले,मात्र मेसेज व्हायरल करण्यामागे वाईट हेतू नव्हता असे शेट्टी यांनी पोस्ट शी बोलताना सांगितले. स्ट्रॉबेरी क्विक’ हा प्रकार परदेशात सुरू असून भारतात यायला त्याला वेळ लागणार नाही यासाठी काळजीपोटी तसेच लोकांनी सतर्क राहावे म्हणून हा मेसेज तयार करून व्हायरल केल्याचे शेट्टी यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ शी बोलताना सांगितले.
(हेही वाचा – Delhi Assembly Election : … म्हणून मुख्यमंत्री निवडण्यास होतोय उशीर!)
पोलीस काय म्हणतात?
ठाण्यातील अंमली पदार्थ (Narcotics) विरोधी कक्षाचे एका पोलीस अधिकारी यांनी म्हटले आहे की, गुलाबी रंगांची टेडी बेअरच्या आकाराच्या गोळीचा फोटो हा प्रतिकात्मक फोटो “ही प्रतिमा २०१७ पासून परदेशातील एका जुन्या प्रकरणाची आहे. मुंबई आणि ठाण्यात अशा घटनेची कुठलीही नोंद नाही, किंवा व्हायरल व्हिडिओमध्ये केलेल्या दाव्यांना पुष्टी देणारी अशी कोणतीही प्रकरणे नोंदवलेली नाहीत,” असे अधिकारी यांनी म्हटले आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community