IAS Transfer: राज्यात ९ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोकण विभागीय आयुक्तपदी विजय सूर्यवंशी यांची वर्णी

125
मुंबई प्रतिनिधी

राज्य सरकारने मंगळवारी भारतीय प्रशासकीय सेवेतील (Indian Administrative Service) ९ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी (Dr. Vijay Suryavanshi) यांची बदली कोकण विभागीय आयुक्त (Konkan Divisional Commissioner) म्हणून झाली आहे. तर  कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांची नेमणूक राज्य उत्पादन शुल्क आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. (IAS Transfer)आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे (Tribal Development Commissioner) यांची बदली महिला आणि बालविकास आयुक्त, पुणे येथे झाली आहे.  समग्र शिक्षा अभियानाच्या राज्य प्रकल्प संचालक (State Project Director of Samagra Shiksha Abhiyan) विमला आर. यांची नेमणूक निवासी आयुक्त आणि सचिव म्हणून महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे करण्यात आली आहे. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची बदली साखर आयुक्त (Siddharam Salimath Sugar Commissioner), पुणे येथे झाली आहे. तर भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मिलिंदकुमार साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

(हेही वाचा – कानिफनाथ महाराज देवस्थान प्रकरणी Bombay High Court ने मुस्लिम गटाला बजावली कारणे दाखवा नोटीस)

धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची बदली सोलापूर महापालिका आयुक्तपदी, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांची बदली आदिवासी विकास आयुक्त, नाशिक येथे तर गडचिरोलीचे सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल कुमार मीना यांची बदली लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी झाली आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.