विधानसभा निवडणुकीतील यशानंतर शिवसेनेने महापालिका निवडणुकीसाठी (Municipal election) तयारी सुरू केली आहे. “उंच भरारी घ्यायची असेल तर गरुड (बाज) बनावे लागेल, धोकेबाज बनून चालणार नाही,” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितले.
वरळी येथील मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना एकजूट होण्याचे आवाहन केले. “विधानसभेत एक झटका दिलाय, आता मुंबई महापालिकेत दुसरा झटका द्यायचा आहे,” असे ते म्हणाले. प्रत्येक वॉर्डात शिवसेनेच्या शाखा बळकट करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
(हेही वाचा – १९ फेब्रुवारी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक Chhatrapati Shivaji Maharaj यांची तारखेनुसार जयंती)
मुंबईच्या विकासावर भर
शिंदे (Eknath Shinde) यांनी पुनर्विकासाला गती देण्याचे आश्वासन दिले. “कोणीही मुंबई आपल्यापासून तोडू शकत नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी म्हाडा (MHADA), एमएमआरडीए (MMRDA) आणि एमआयडीसीच्या (MIDC) माध्यमातून क्लस्टर डेव्हलपमेंट राबवली जाणार असल्याचे सांगितले.
विरोधकांवर हल्लाबोल
शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. “मुंबईच्या रस्त्यांच्या दुरुस्तीत ३५०० कोटींचा गैरव्यवहार झाला आहे,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, “खोके खोके म्हणणाऱ्यांना महाराष्ट्राच्या जनतेनेच बंद केले,” असेही ते म्हणाले.
महापालिकेच्या विजयासाठी तयारी
शिंदे (Eknath Shinde) यांनी २०२५ महापालिका निवडणुकीत (Municipal election) विजय मिळवण्यासाठी शिवसैनिकांना सज्ज राहण्याचे आदेश दिले. “शिवसेनेचा झेंडा पुन्हा महापालिकेत फडकवू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community