Realme P3 Pro : रिअलमीची पी३ प्रो ५जी, पी३एक्स मालिका भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

रियलमीचा हा अंधार चमकणारा फोन आहे.

48
Realme P3 Pro : रिअलमीची पी३ प्रो ५जी, पी३एक्स मालिका भारतात लाँच, जाणून घ्या किंमत
Realme P3 Pro : रिअलमीची पी३ प्रो ५जी, पी३एक्स मालिका भारतात लाँच, जाणून घ्या किंमत
  • ऋजुता लुकतुके

रिअलमी कंपनीचा (Realme company) अंधारात चमकणारा फोन म्हणून रिअलमी पी३ प्रो, पी३एक्स हे फोन सगळ्यांना लक्षात राहतील. फोनचा मागचा भाग खरंच अशा फायबरचा बनलेला आहे, जो वातावरणातील प्रकाश शोषून घेतो. मग अंधारातही तो प्रकाश उत्सर्जित करू शकतो. त्यामुळे सौम्य हिरव्या रंगाचा प्रकाश फोनच्या कव्हरमधून उत्सर्जित होत राहतो. अशा प्रकारचा हा पहिला फोन असणार आहे. त्यासाठी वीजेची अजिबात गरज नाही. फोन चार्जरशी जोडलेला नसतानाही हिरवा प्रकाश फोनमधून दिसत राहतो.

मंद हिरव्या रंगाबरोबरच हा फोन जांभळ्या आणि तपकिरी रंगातही उपलब्ध आहे. या फोनचे फिचर बघितलेत तर ६.८ इंचांचा एमोल्ड डिस्प्ले या फोनला देण्यात आला आहे. त्याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्झचा आहे. हा फोन वाळू आणि पाण्यापासून सुरक्षित आहे. फोनच्या आत स्नॅपड्रॅगनचा सातव्या पिढीतील ऑक्टा ३ प्रोसेसर बसवण्यात आला आहे. पी३ एक्स मालिकेतील डिस्प्ले हा ६.३ इंचांचा आहे. आणि यात दोन सिमबरोबरच एक एसडी कार्ड स्टोरेज स्लॉटही देण्यात आला आहे.

(हेही वाचा – Samruddhi Mahamarg : ‘समृद्धीवर सुविधा द्या, अन्यथा दंड भरा’ ; नागपूर खंडपीठाने तेल कंपन्यांना फटकारले)

((हेही वाचा – Dance Bar बाबतच्या सुधारित कायद्यावर मंत्रिमंडळात चर्चा)

रिअलमी पी३ प्रोमधील (Realme P3 Pro) मुख्य कॅमेरा हा ५० मेगापिक्सेलचा सोनी कॅमेरा (Sony camera) आहे. तर यात २ मेगापिक्सेलचा डेप्थ कॅमेराही (Depth camera) देण्यात आला आहे. शिवाय यात एलईडी लाईटही आहे. सेल्फी कॅमेरा हा १६ मेगापिक्सेलचा आहे. हा फोन ८ जीबी तसंच १२ जीबीच्या रॅमसह उपलब्ध आहे. तर स्टोरेजही १२४ जीबी आणि २५६ जीबींचं उपलब्ध असेल. बॅटरी ६,००० एमएएच क्षमतेची आहे. तर ८० वॅटचा जलदगती चार्जर २० मिनिटांत फोन पूर्णपणे चार्ज करतो.

८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजचा फोन २३,९९९ रुपयांपासून सुरू होतो. तर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजचा फोन हा २६,९९९ रुपयांना उपलब्ध आहे.

रिअलमी पी३एक्स (Realme P3X) हा फोन गेमिंग अनुभवासाठी चांगला आहे. त्यामुळे यातील प्रोसेसरही मीडियाटेक डिमेंसिटीचा ६,००० क्षमतेचा आहे. या फोनची किंमत १३,९९९ रुपयांपासून सुरू होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.