देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात आता Air ambulance ची सेवा मिळणार

66
देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात आता Air ambulance ची सेवा मिळणार
देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात आता Air ambulance ची सेवा मिळणार

आपत्कालीन वैद्यकीय वाहतुकीत (emergency medical transport) क्रांती घडवून आणून, ऑन-रोड व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग (VTOL) एअर अॅम्ब्युलन्स (Air ambulance) सेवा सुरू करणाऱ्या जगातील काही मोजक्या देशांपैकी भारत एक बनण्याच्या तयारीत आहे. आयआयटी-मद्रास-आधारित स्टार्टअप ईप्लेन कंपनी (Startup ePlane Company) आणि भारतातील आघाडीची एअर अॅम्ब्युलन्स (Air ambulance) फर्म, आयसीएटीटी यांच्यात ७८८ इलेक्ट्रिक एअर अॅम्ब्युलन्स (Air ambulance) तैनात करण्यासाठी १ अब्ज डॉलर्सचा करार झाला आहे, जो भारताच्या शहरी एअर मोबिलिटी क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण झेप आहे.

एअर ॲम्बुलन्सला धावपट्टीची गरज नाही
भारतातील आघाडीची हवाई रुग्णवाहिका (Air ambulance) कंपनी ‘आयसीएटीटी’ला ७८८ एअर ॲम्ब्युलन्स देण्यात येणार आहेत. त्यामुळे भविष्यात वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मदत होणार आहे. या एअर ॲम्बुलन्स देशातील प्रत्येक जिल्ह्यात तैनात केल्या जाणार आहेत. ईव्हीटीओएल या तंत्रज्ञानामुळे एअर ॲम्बुलन्स थेट जमिनीवरून उड्डाण करू शकते. शिवाय जमिनीवर उतरण्यासाठी या ॲम्बुलन्सला (Air ambulance) धावपट्टीची गरज लागणार नाही.

एअर ॲम्ब्युलन्स पूर्णपणे इलेक्ट्रिक
हेलिकॉप्टरप्रमाणे सुविधा देणारी ही एअर ॲम्ब्युलन्स पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे. भारतात ईव्हीटीओएल निर्माण करण्याच्या क्षेत्रात ईप्लेन कंपनीसोबतच आर्चर एव्हिएशन, सरल एव्हिएशन यांचा समावेश आहे. उबरसारख्या ॲपवर आधारित टॅक्सी सेवा कंपन्यादेखील हवाई टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी प्रोटोटाइपचा विकास व चाचणी करत आहेत. (Air ambulance)

‘अशी’ असेल एअर ॲम्ब्युलन्स
एअर ॲम्ब्युलन्सचा विंगस्पॅन अर्थात पंखांचा विस्तार ८ मीटर आहे. त्यामुळे ही ॲम्ब्युलन्स घराच्या छतावर किंवा रस्त्यालगतच्या कमी जागेवरही लँड केली जाऊ शकते. रस्त्यावरून धावणाऱ्या रुग्णवाहिकेपेक्षा या ॲम्बुलन्सचा वेग सात पट अधिक आहे. (Air ambulance)

प्रत्येक वर्षी किमान १०० एअर ॲम्बुलन्सची निर्मिती करण्याचे लक्ष्य आहे. २०२६ शेवटच्या तिमाहीत एअर ॲम्बुलन्स सेवा सुरू करण्यात येईल. स्टार्टअपसाठी जवळपास ८६० अब्ज रुपयांचा अतिरिक्त निधी जमा करण्याचा प्रयत्न आहे. (Air ambulance)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.