Rahul Gandhi यांच्याकडून पुण्याचा अपमान; म्हणतात, पुण्यात येणे असुरक्षित

144

स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात पुणे सत्र न्यायालयात (Pune Sessions Court) खटला चालू आहे. या प्रकरणी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वकिलांमार्फत दाव्याच्या सुनावणी दरम्यान न्यायालयात स्वतः हजर रहाण्यापासून कायमस्वरूपी सूट मिळावी, असा अर्ज न्यायालयात दाखल केला होता. या अर्जात पुणे येथे खटल्यासाठी उपस्थित न रहाण्यासाठी संतापजनक कारणे दिली आहेत.

(हेही वाचा – Vaibhav Naik यांच्यासाठी Shiv Sena आणि UBT मध्ये रस्सीखेच!)

पुण्याला ठरवले धोकादायक

पुणे सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात राहुल गांधी यांनी एकप्रकारे पुण्याची अपकीर्तीच केली आहे. पुणे न्यायालयाची जागा सुरक्षित नाही, धोकादायक आहे. या न्यायालयाच्या परिसरात बॉम्बस्फोट करण्याच्या धमक्याही यापूर्वी आल्या होत्या. तसेच वीर सावरकर महात्मा गांधी खटल्यात सहआरोपी होते, त्या खटल्यात नथुराम गोडसे हेही सहआरोपी होते. नथुराम गोडसे हे पुण्याचे होते. या खटल्याचाही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी संबंध आहे. त्यामुळे राहुल गांधी पुणे न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाहीत, अशी कारणे न्यायालयाला दिलेल्या अर्जात नमूद करण्यात आली आहेत. (veer savarkar defamation case)

विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहराला धोकादायक ठरवणे, हा या शहराचा अपमान आहे. राहुल गांधी काँग्रेस (Congress) या राष्ट्रीय पक्षाचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी पुण्याच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हा पुणेकरांच्या भावना दुखावण्याचा प्रकार आहे, अशा भावना वीर सावरकर मानहानी प्रकरणातील अधिवक्ता संग्राम कोल्हटकर यांनी व्यक्त केल्या आहेत.

धक्कादायक म्हणजे न्यायालयीन कामकाजात सहभागी होण्यासाठी पुण्यात येतांना अनेक कारणे देणारे राहुल गांधी राजकीय दौऱ्यांसाठी मात्र डिसेंबर २०२४ मध्येच पुण्यात आले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.