जागतिक सामाजिक न्याय दिन दरवर्षी २० फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. समाजात समानता, न्याय, मानवी हक्क शाबूत ठेवणे आणि दारिद्र्य निर्मूलनाला प्रोत्साहन देणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे. हा दिवस दरवर्षी २० फेब्रुवारी रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी २००७ मध्ये हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. (World Day of Social Justice 2025)
सामाजिक न्याय म्हणजे सर्व लोकांसाठी समान हक्क आणि संधी, त्यांची जात, धर्म, लिंग, रंग किंवा सामाजिक स्थिती काहीही असो सगळे समान असतात हा भाव… याद्वारे शिक्षण, रोजगार, आरोग्य, मानवी हक्क आणि राजकीय सहभागामध्ये समानतेला प्रोत्साहन दिले जाते. (World Day of Social Justice 2025)
(हेही वाचा – Mahakumbh चा अवमान केल्याप्रकरणी ममता बॅनर्जींना तुरुंगात टाका; महंत अनिकेतशास्त्री महाराज यांची मागणी)
आता आपण या दिनाची कथा जाणून घेणार आहोत. १९९५ मध्ये, डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे सामाजिक विकासासाठी जागतिक शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. या शिखर परिषदेत १०० हून अधिक राजकीय नेत्यांनी गरिबी निर्मूलन, पूर्ण रोजगार तसेच लोकांचे राहणीमान सुधारण्याचे उद्दिष्ट ठेवले. (World Day of Social Justice 2025)
पुढे २६ नोव्हेंबर २००७ रोजी, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने कोपनहेगन येथे झालेल्या या शिखर परिषदेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी २० फेब्रुवारी हा दिवस जागतिक सामाजिक न्याय दिन म्हणून घोषित केला. संयुक्त राष्ट्रांनी म्हटले “या दिवशी, आंतरराष्ट्रीय समुदायाने गरिबी निर्मूलनासाठी काम केले पाहिजे. सर्वत्र लोकांना चांगले काम आणि रोजगाराची उपलब्धता सुनिश्चित केली पाहिजे, तरच सामाजिक न्याय शक्य आहे.” २००९ मध्ये हा दिवस पहिल्यांदा जगभरात साजरा करण्यात आला. (World Day of Social Justice 2025)
(हेही वाचा – राज्य शासनाच्या वतीने किल्ले संवर्धनाचे काम सातत्याने सुरु; CM Devendra Fadanvis यांचे विधान )
या दिनानिमित्त अदरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित केले जातात. या दिवशी शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायाचे महत्त्व समजावून देण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी विविध संस्था आणि सरकारांकडून चर्चासत्रे, कार्यशाळा आणि जागरूकता कार्यक्रम आयोजित केले जातात. सामाजिक न्यायाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली जाते आणि उपाय सुचवले जातात. (World Day of Social Justice 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community