छावा चित्रपटामुळे क्रूरकर्मा औरंगजेबने (Aurangzeb) स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे यांच्यावर अनन्वित अत्याचार करून त्यांना ठार केल्याचा इतिहास दृश्य स्वरुपात समाजासमोर आला आहे. त्यामुळे हिंदूंमध्ये मुघल शासकांच्या विरोधात संताप वाढलेला दिसत आहे. अशा वेळी शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष, दुर्गराज रायगड आणि मुंबई मराठा महासंघाचे माजी अध्यक्ष सुनील पवार यांनी आक्रमक घोषणा केली आहे. त्यांनी औरंगजेबाची (Aurangzeb) कबर सुरुंग लावून उडवून देणार असल्याची घोषणा केली आहे.
(हेही वाचा Mahakumbh चा अवमान केल्याप्रकरणी ममता बॅनर्जींना तुरुंगात टाका; महंत अनिकेतशास्त्री महाराज यांची मागणी)
सुनील पवार काय म्हणाले?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शंभू महाराजांच्या हिंदू स्वराज्यातील सर्व मावळ्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवावी, नजीब खानाची कबर पानिपतमध्ये झालेल्या मराठ्यांच्या पराभवाने पेटून उठलेल्या मावळ्यांनी सुरुंग लावून उडवून दिली होती. एक ना एक दिवस शिवरायांचे मावळे औरंगजेबाची (Aurangzeb) कबर सुरुंग लावून उडवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीत.छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, थोरले बाजीराव पेशवे, छत्रपती राजाराम महाराज यांच्यासोबत राहून मुघलांच्या विरोधात आपले प्राण पणाला लावलेल्या सर्वच मावळ्यांना शिवराज्याभिषेक समितीकडून आदरांजली वाहण्यात येईल, असेही सुनील पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community