
-
प्रतिनिधी
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ (Sanjay Shirsat) यांनी बुधवारी ज्येष्ठ मूर्तिकार पद्मभूषण पुरस्कार प्राप्त राम सुतार यांच्या गाझियाबाद येथील कार्यशाळेस भेट देऊन मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 350 फुट उंच भव्य पुतळ्याच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला.
(हेही वाचा – तुम्ही अतिरिक्त तिकिटे का विकता? Delhi station stampede नंतर दिल्ली उच्च न्यायालयाने रेल्वेला फटकारले)
यावेळी सुप्रसिद्ध मूर्तिकार सुतार, त्यांचे पुत्र अनिल सुतार, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, उपस्थित होते. सामाजिक न्याय मंत्री शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी पुतळ्याच्या कामाची गुणवत्ता, प्रगती, इत्यादींचा आढावा घेऊन सुतार आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. राम सुतार यांचा 100 वा वाढदिवस असून या औचित्यांनी शिरसाठ (Sanjay Shirsat) यांच्या उपस्थितीत साजरा केल्याने आनंद द्विगुणीत झाल्याची भावना सुतार यांनी यावेळी व्यक्त केल्या.
(हेही वाचा – Mithi River Silt Scam : तीन कंत्राटदारांची एसआयटीकडून चौकशी)
तत्पूर्वी महाराष्ट्र सदन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी राजे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यासमयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community