-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती बुधवारी १९ मार्च रोजी राज्यातील विविध ठिकाणी जल्लोषात साजरी करण्यात आली. शासकीय शिवजयंती १९ मार्च रोजी साजरी केली जात असून तारखेप्रमाणे शिवजयंती आपल्याला मान्य नाही असे म्हणणाऱ्या शिवसेना उबाठाच्यावतीनेही (Shiv Sena UBT) ही शिवजयंती साजरी केली. त्यामुळे तिथी प्रमाणेच शिवजयंती साजरी करण्याचा हट्ट धरणाऱ्या आणि दोन दोन जयंती साजरी करणाऱ्य शिवसेना उबाठाने (Shiv Sena UBT) शासकीय शिवजयंती साजरी करत तसेच शुभेच्छा देत एकप्रकारे तारखेप्रमाणे साजरी होणारी शिवजयंती आपल्याला मान्य असल्याचेच आता स्पष्ट केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीबाबत २००० मध्ये विधानसभेत प्रस्ताव संमत करत शिवरायांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला होता. परंतु हिंदु पंचांगानुसार, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला झाला आहे. त्यामुळे शासकीय शिवजयंती १९ फेब्रुवारी रोजी साजरी करण्यास शिवसेना उबाठाने (Shiv Sena UBT) विरोध करत आम्ही तिथीप्रमाणेच शिवजयंती साजरी करू असे सांगत दोन दोन शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली.
(हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 किल्ले लवकरच जागतिक वारसा केंद्र होणार; CM Devendra fadnavis यांची घोषणा)
परंतु, नोव्हेंबर २०१९ मध्ये आघाडीचे सरकार आल्यानंतर शिवसेना उबाठाने (Shiv Sena UBT) तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी न करता त्या मार्च २०२० मधील तिथी प्रमाणे शिवजयंती साजरी केली आणि या शिवजयंती कार्यक्रमासाठी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहिले होते. त्यामुळे शासकीय शिवजयंती मान्य नसणाऱ्या शिवसेना उबाठाच्यावतीने तसेच पदाधिकाऱ्यांनी आपल्या शाखांमध्ये शिवजयंती साजरी केल्याचे दिसून येत आहे. शिवसेना उबाठाचे (Shiv Sena UBT) एक्सवर ‘राजं, मानाचा मुजरा’ अशा शब्दांत मानाचा मुजरा केला आहे. या पोस्टवर शिवसेना उबाठाचे (Shiv Sena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पृष्पवृष्टी करत असल्याचे छायाचित्र पोस्ट केले. शिवसेना उबाठाच्या एक्सवरील सर्व हँडलववर महाजांना जयंती दिनानिमित्त मानाचा मुजरा केला आहे.
तसेच मालाड दिंडोशी येथील शिवसेना उबाठाचे आमदार सुनील प्रभू यांनी मध्यरात्रीच १२ वाजता शिवजयंती साजरी केली. तर भायखळा येथील शिवसेना उबाठाचे (Shiv Sena UBT) आमदार मनोज जामसुतकर यांनीही सोशल मिडियावर पोस्ट करत शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community