अखेर JNU तील मराठी अध्यासनाला मुहूर्त मिळाला; कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी होणार उद्घाटन

51
अखेर JNU तील मराठी अध्यासनाला मुहूर्त मिळाला; कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी होणार उद्घाटन
अखेर JNU तील मराठी अध्यासनाला मुहूर्त मिळाला; कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी होणार उद्घाटन

गेल्या २० वर्षांपासून जवाहरलाल नेहरु विश्वविद्यापीठ (Jawaharlal Nehru University) अर्थात जेएनयूमध्ये (JNU) रखडलेल्या मराठी भाषा अध्यासनाचा विषय अखेरीस दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मार्गी लागणार आहे. २७ फेब्रुवारी या कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी जेएनयुमध्ये कुसुमाग्रजांच्याच नावे मराठी अध्यासन सुरू करण्यात येणार आहे. या अध्यासनासाठी राज्य सरकारकडून १० कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे, असे मराठी भाषा मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी एका कार्यक्रमात सांगितले.

(हेही वाचा – प्रयागराजमधील पाण्याची गुणवत्ता चांगलीच; Yogi Adityanath यांचा विधानसभेत खुलासा)

दिल्लीच्या (Delhi) तालकटोरा स्टेडीयममध्ये २१, २२, २३ फेब्रुवारी या दिवशी ९८ वे मराठी साहित्य संमेलन (marathi sahitya sammelan 2025) होत आहे. त्यानिमित्ताने पुणे येथून विशेष ट्रेन बुधवार, १९ जानेवारी या दिवशी दिल्लीकडे रवाना झाली. या वेळी मंत्री सामंत यांनी ही माहिती दिली.

दिल्लीतील मराठी विद्यार्थ्यांकडे सरकारचे लक्ष

या वेळी उदय सामंत यांनी मराठीच्या संवर्धनासाठी दिल्लीत केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची दिशा स्पष्ट केली. राज्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी वा संशोधनासाठी दिल्लीत वास्तव्य करतात. त्यांच्यासाठी हॉस्टेलची सुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल. दिल्लीतील मराठी शाळांना निधी पुरवण्याचा निर्णयही घेतला आहे. ‘जेएनयू’ने विद्यापाठाच्या आवारात जागा दिली, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभा केला जाईल. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठी भाषेच्या विकास व संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून निधी पुरवला जातो. (marathi dept in jnu) त्यातील काही निधी ‘जेएनयू’मध्ये (JNU) छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भवन उभारण्यासाठी वापरला जाईल. दोन्ही अध्यासन केंद्रांसाठी आवश्यक ग्रंथालय इथे सुरू होऊ शकते, असे सामंत म्हणाले. साहित्य संमेलनासाठी देण्यात येणाऱ्या निधीमध्ये वाढ करण्याचाही विचार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.