MHADA च्या रिक्त घरांची माहिती गोळा करण्याचे उपाध्यक्षांचे अधिकाऱ्यांना निर्देश

63
MHADA च्या रिक्त घरांची माहिती गोळा करण्याचे उपाध्यक्षांचे अधिकाऱ्यांना निर्देश
MHADA च्या रिक्त घरांची माहिती गोळा करण्याचे उपाध्यक्षांचे अधिकाऱ्यांना निर्देश

म्हाडा (MHADA ) मुख्यालयात विविध मंडळांच्या मिळकत व्यवस्थापक विभागांची बैठक पार पडली. या आढावा बैठकीत म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल (Sanjeev Jaiswal) यांनी रिक्त घरांची माहिती गोळा करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. ही घरे नेमकी कुठे आणि किती आहेत, याचा थांगपत्ता म्हाडालाही नाही. त्यामुळे ही माहिती गोळा करण्यासाठी सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (MHADA )

हेही वाचा-Maha kumbh 2025: योगी सरकारचा मोठा निर्णय ; ९० हजार कैद्यांना मिळणार महाकुंभमेळ्यात स्नानाची संधी

जयस्वाल म्हणाले, म्हाडाने (MHADA ) आजवर राज्यात सुमारे ९ लाख घरे उभारली आहेत. यापैकी २.५ लाख घरे केवळ मुंबई मंडळाच्या (Mumbai Board) अखत्यारीत आहेत. त्यामुळे या घरांची संपूर्ण माहिती मंडळाकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक मंडळाच्या मिळकत व्यवस्थापकाने आपल्या कार्यक्षेत्रातील इमारतींची व गृहनिर्माण संस्थांची यादी तयार करून दोन आठवड्यांच्या कालावधीत सादर करावी, तसेच म्हाडा वसाहतींतील इमारती व त्यामधील घरांचे बाह्य यंत्रणांच्या साहाय्याने सर्वेक्षण करून एका महिन्याच्या आत अहवाल सादर करावा. (MHADA )

हेही वाचा-प्रयागराजमधील पाण्याची गुणवत्ता चांगलीच; Yogi Adityanath यांचा विधानसभेत खुलासा

थकीत सेवा शुल्कबाबत जयस्वाल यांनी सांगितले की, सर्व प्रथम मिळकत व्यवस्थापन विभागाने इमारत निहाय थकीत सेवा शुल्क व भूभाडे इत्यादिच्या थकीत रकमेची माहितीचा अहवाल मिळकत व्यवस्थापक कार्यक्षेत्रानुसार दोन आठवड्यात सादर करावा. (MHADA )

हेही वाचा-Matka Gambling : ‘हिंदुस्थान पोस्ट’चा दणका; कुर्ल्यातील मटका जुगारावर पोलिसांची कारवाई 

म्हाडाच्या (MHADA ) अतिक्रमण निर्मूलन कक्षाला अधिक बळकट करणे गरजेचे आहे. यासाठी कक्षात आवश्यक मनुष्यबळ, इतर यंत्रणा जसे वाहन, सीसीटीव्ही आदी बाबी सुरू करून हा कक्ष बळकट करावा. मुंबई मंडळाच्या धर्तीवर मुंबई इमारत दुरुस्ती, पुनर्रचना मंडळासाठीही अतिक्रमण निर्मूलन कक्ष सुरू करावा, असे त्यांनी सांगितले. (MHADA )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.