Delhi CM Oath Ceremony : ही एक मोठी जबाबदारी आहे; शपथविधीपूर्वी रेखा गुप्ता यांनी व्यक्त केल्या भावना

64

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील (Delhi Assembly Elections) घवघवीत यशानंतर दिल्ली भाजपाने (BJP) मुख्यमंत्रीपदी महिला चेहरा देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. रेखा गुप्ता (Rekha Gupta) २० फेब्रुवारी या दिवशी दुपारी १२ वाजता रामलीला मैदानावर शपथ घेणार आहेत. त्या दिल्लीच्या ७ व्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री आहेत. रेखा गुप्ता यांच्यासोबत 6 मंत्रीही शपथ घेतील. (Delhi CM Oath Ceremony)

(हेही वाचा – Maha kumbh मध्ये कोट्यवधींच्या उलाढालीने अर्थव्यवस्थेला मोठी गती; उद्योग महासंघाचा दावा काय ?)

यामध्ये प्रवेश वर्मा (Pravesh Verma), आशिष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, रविंदर इंद्रराज सिंग, कपिल मिश्रा आणि पंकज कुमार सिंग यांची नावे आहेत. बुधवारी संध्याकाळी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली.

ही एक मोठी जबाबदारी आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी आणि भाजप हायकमांडचे आभार मानतो. मी कधीच विचार केला नव्हता की, मी दिल्लीचा मुख्यमंत्री होईन. हा जणू चमत्कारच आहे, अशा भावना रेखा गुप्ता यांनी गुरुवारी सकाळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या आहेत. रेखा गुप्ता यांचे पती मनीष गुप्ता यांनीही याविषयी आनंद व्यक्त केला आहे. आम्हाला कधीच वाटले नव्हते की, त्या (रेखा गुप्ता) दिल्लीच्या मुख्यमंत्री होतील. हे चमत्कारासारखे वाटते. पक्षाने आम्हाला इतका आदर दिला आहे ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, असे मनीष गुप्ता यांनी म्हटले आहे.

भाजपाने या शपथविधी सोहळ्याची रामलीला मैदानावर जय्यत तयारी केली आहे. (Delhi CM Oath Ceremony)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.