पाकिस्तानच्या ISI या गुप्तचर खात्याच्या पथकाने नुकतीच बांगलादेशला भेट दिली. त्यामुळे भारत अधिक सतर्क झाला आहे. या पथकाने सिलिगुडीला लागून असलेल्या भागांना भेट दिली. पाकिस्तान दहशतवादी संघटना भारतविरोधी कारवाया करण्यासाठी बळ देत असते. यामध्ये ISI ची प्रमुख भूमिका असते.
(हेही वाचा Veer Savarkar यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त सादर होणार ‘माझी जन्मठेप’चा रंगमंचीय नाट्याविष्कार)
बांगलादेशातील अंतरिम युनूस सरकारचा पाकिस्तानच्या बाजूने कल अधिक आहे. म्हणून देशात सत्ताबदल झाल्यापासून पाकिस्तानशी बांगलादेशने संबंध वाढवले आहेत. काही दिवसांपूर्वी बांगलादेश सैन्याचे वरिष्ठ अधिकारी पाकिस्तानातील रावळपिंडी येथे गेले होते. यानंतर पाकिस्तानच्या ISI गुप्तचर संस्थेचे अनेक वरिष्ठ अधिकारी अलीकडेच ढाक्याला आले होते. या भेटीदरम्यान पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांनी बांगलादेशी लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी भेट घेतली आणि भविष्यातील योजनांवर चर्चा केली. भारताचे बांगलादेशसोबत संबंध अनेक दशकांपासून चांगले आहेत, म्हणूनच भारत बांगलादेशच्या पाकिस्तानशी वाढत्या जवळीकतेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारत बांगलादेश आणि पाकिस्तानी सैन्याच्या बैठकांवर आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि भारत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास सक्षम आहे.
Join Our WhatsApp Community