रेखा गुप्ता देशातील १८व्या महिला मुख्यमंत्री; याआधी कुणाला मिळाला बहुमान?

-भारतातील महिला मुख्यमंत्र्यांबद्दल बोलायचे झाले, तर आतापर्यंत १७ महिला मुख्यमंत्री झाल्या आहेत आणि दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता या देशाच्या १८व्या महिला मुख्यमंत्री आहेत.

आतिशी मार्लेना (आप) या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, त्यांनी २१ सप्टेंबर २०२४ ला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

मेहबूबा मुफ्ती (पीडीपी) जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री होत्या. त्यांनी ४ एप्रिल २०१६ ला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

* आनंदीबेन पटेल (भाजपा) या गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री, त्यांनी २२ मे २०१४ ला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 

ममता बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस) यांनी २० मे २०११ ला पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या, आजपर्यंत त्या या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत.

-भारतातील महिला मुख्यमंत्र्यांबद्दल बोलायचे झाले, तर आतापर्यंत १७ महिला मुख्यमंत्री झाल्या वसुंधरा राजे (भाजपा) यांनी ८ डिसेंबर २००३ ला राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.आहेत आणि दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता या देशाच्या १८व्या महिला मुख्यमंत्री आहेत.

उमा भारती (भाजपा) यांनी मध्य प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून ८ डिसेंबर २००३ ला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

शीला दीक्षित (काँग्रेस) या दिल्लीतील दुसऱ्या महिला मुख्यमंत्री, त्यांनी ३ डिसेंबर १९९८ ला शपथ घेतली. त्या सलग १५ वर्षे मुख्यमंत्री होत्या.

सुषमा स्वराज (भाजपा) या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या, त्यांनी १२ ऑक्टोबर १९९८ ला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

राबडी देवी (राजद) यांनी २५ जुलै १९९७ ला बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

राजिंदर कौर भट्टल (काँग्रेस) यांनी २१ नोव्हेंबर १९९६ ला पंजाबच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

मायावती (बसपा) यांनी १३ जून १९९५ ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

* जयललिता (एआयएडीएम) या यांनी २४ जून १९९१ ला तामिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या सहा वेळा राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या.

जानकी रामचंद्रन यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची  ७ जानेवारी १९८८ ला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्या केवळ २४ दिवसांसाठी मुख्यमंत्री होत्या.

सय्यदा अन्वारा तैमूर (काँग्रेस) यांनी आसामच्या ६ डिसेंबर १९८० ला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

शशिकला काकोडकर (एमजेपी) यांनी १२ ऑगस्ट १९७३ ला गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

नंदिनी सत्पथी (काँग्रेस) या ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. १४ जून १९७२ ला त्यांनी मुख्यमंत्री पदाची  शपथ घेतली.

देशाच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी यांनी २ ऑक्टोबर १९६३ ला उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्या स्वातंत्र्यसैनिक होत्या.