‘बांगलादेशी घुसखोर (Bangladesh Infiltration) हाकला, देश वाचवा’ ही मोहीम हिंदू जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी हाती घेतली असून या दृष्टिने दादर (प.) रेल्वे स्थानकाबाहेर २० फेब्रुवारी या दिवशी बांगलादेशी घुसखोरांच्या हद्दपारीसाठी मूक निदर्शने करण्यात आली. यावेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि राष्ट्रप्रेमी नागरिक सहभागी झाले होते.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्हा यांसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तसेच देशभरात बांगलादेशी घुसखोर (Bangladesh Infiltration) मोठ्या संख्येने बेकायदेशीरपणे राहत आहेत. यामुळे देश आणि राज्याच्या सुरक्षेला मोठा गंभीर धोका निर्माण झाला असून सामाजिक अस्थिरता, गुन्हेगारी वाढ, रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे. देशाच्या सुरक्षेसाठी प्रत्येक बांगलादेशी घुसखोर (Bangladesh Infiltration)देशातून हद्दपार करा, बांगलादेशी घुसखोरांना आश्रय देणार्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा.
(हेही वाचा पाकिस्तानच्या ISI च्या पथकाने दिली बांगलादेशला भेट; भारत बनला सतर्क)
संशयित ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबवून, बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढा, आदी मागण्या या मूकनिदर्शनात करण्यात आल्या. याविषयीचे फलक निदर्शनात सहभागी झालेल्यांनी यावेळी हातात घेतले होते. प्रशासनाला या संदर्भातील करण्यात आलेल्या मागण्याच्या निवेदनावर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या सुद्धा घेण्यात आल्या, ज्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बांगलादेशी घुसखोर (Bangladesh Infiltration)हाकला, देश वाचवा !’ या मोहीमेत सर्व जागरूक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
Join Our WhatsApp Community