
-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प (Coastal Road) अंतर्गत पूलाच्या पृष्ठभागावर खड्डे पडल्याने डांबर टाकून ते बुजवण्यात आल्याचे व्हिडीओ सोशल मिडियावरुन व्हायरल होऊ लागले आहे. मात्र, चित्रफितींमध्ये किनारी रस्त्यावर दिसणारे पट्टे (पॅचेस) हे मुळात खड्डे प्रतिबंधक उपाययोजना म्हणून टाकलेल्या मास्टिकच्या आवरणाचे आहेत. पुलावरील पृष्ठभागावरील सांध्यांमध्ये मास्टिक अस्फाल्टचे आवरण टाकल्याने ते खड्डे भरल्यासारखे दिसून येत आहेत. पावसासाठी हे आवरण टाकले असले तरी पावसाळ्यानंतर हे आवरणच काढून टाकण्यास विसरल्याने पुन्हा एकदा खड्ड्यांच्या नावाने कोस्टल रोडला (Coastal Road) टार्गेट केले जात असले तरी असे पॅचेस निर्माण झाल्याने महापालिकेकडे तज्ज्ञ अभियंते नाही का असा सवाल उपस्थित होत आहे.
(हेही वाचा – Bangladesh Infiltration च्या हद्दपारीसाठी दादरमध्ये मूक निदर्शने)
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प (Coastal Road) हा सर्वार्थाने सुरक्षित आहे. जागतिक स्तरावरील अनुभव असलेले सल्लागार, कंपनी यांच्याद्वारे सर्व पैलुंचा अभ्यास करुन या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला. सर्वोत्तम व आधुनिक तंत्रज्ञान वापरुन प्रकल्पाची बांधणी करण्यात आली आहे. सुरक्षित वाहतुकीशी संबंधित सर्व चाचण्या व मानके पूर्ण करुन वाहतुकीसाठी टप्प्या-टप्प्याने मार्ग खुले करण्यात आले आहेत. एकूणच, या प्रकल्पावर कोणतेही खड्डे, तडे वगैरे नाहीत आणि वाहतुकीसाठी खुले करुन दिलेले मार्ग देखील सुस्थितीत आहेत.
(हेही वाचा – DCM Eknath Shinde म्हणाले, धमक्याना मी घाबरत नाही; मी माझे…)
मुंबई किनारी रस्ता अंतर्गत उत्तर दिशेने जाणारा मार्ग (चौपाटी ते वरळी) (Coastal Road) हा जुलै २०२४ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यापूर्वी त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. तथापि, डांबरीकरण पूर्णपणे मजबूत रहावे, टिकावे यासाठी त्यावर मास्टिकचे अतिरिक्त आवरण ठिकठिकाणी टाकण्यात आले आहे. पुलावरील मार्गिकांमधील सांधे एकसंध राहावे म्हणून मास्टिकचे आवरण टाकले असले तरी पावसाळ्यानंतर हे आवरण काढून टाकणे आवश्यक असतानाही आवरण तसेच ठेवल्यामुळे पुन्हा एकदा या मार्गावर खड्डे पडल्याचे व्हिडीओ सोशल मिडियावरून व्हायरल व्हायला लागले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community