International Mother Language Day म्हणजेच आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन का साजरा केला जातो?

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दरवर्षी २१ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.

73
International Mother Language Day म्हणजेच आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन का साजरा केला जातो?
International Mother Language Day म्हणजेच आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन का साजरा केला जातो?

International Mother Language Day म्हणजे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दरवर्षी २१ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. भाषिक आणि सांस्कृतिक विविधता टिकवून ठेवण्यासाठी आणि विविध भाषांचे जतन करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

युनेस्कोने (UNESCO) १७ नोव्हेंबर १९९९ रोजी घोषित केले होते. पुढे २००२ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने संयुक्त राष्ट्रांच्या ठराव ५६/२६२ स्वीकारून औपचारिकपणे मान्यता दिली. भाषा केवळ संवादाचे साधन नाही तर आपली ओळख, संस्कृती आणि इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. भावी पिढ्यांनाही त्यांच्या मातृभाषेचा अभिमान वाटावा आणि भाषिक विविधता टिकवून ठेवावी म्हणून हा दिन साजरा जेली जातो.

(हेही वाचा – Champions Trophy, Ind vs Ban : रोहित शर्माने झेल सोडून अक्षरची हॅट ट्रीक हुकवली तो क्षण)

मातृभाषेतील सुरुवातीचे शिक्षण मुलांच्या बौद्धिक विकासात मदत करते. भाषा ही कोणत्याही समुदायाच्या ओळखीचा आणि संस्कृतीचा आधार असते. हा दिवस सर्व भाषांना समान महत्त्व देण्याचा आणि भाषिक भेदभाव संपवण्याचा संदेश देतो. भारतासह अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा (International Mother Language Day) केला जातो.

जगात बोलल्या जाणाऱ्या अंदाजे ६००० भाषांपैकी किमान ४३% भाषिक धोक्यात आहेत. शिक्षण प्रणाली आणि सार्वजनिक क्षेत्रात प्रत्यक्षात फक्त काहीशे भाषांचा समावेश झाला आहे आणि डिजिटल जगात शंभरपेक्षा कमी भाषा वापरल्या जातात. म्हणूनच हा दिवस महत्त्वाचा ठरतो.

या दिवशी शैक्षणिक संस्थांमध्ये भाषिक जागरूकता मोहिमा आणि स्पर्धा आयोजित केल्या जातात. सांस्कृतिक कार्यक्रम आणि साहित्यिक चर्चा आयोजित केल्या जातात. मातृभाषेतून शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणे आखली जातात. विविध भाषा आणि बोलीभाषा जपण्यासाठी संशोधन आणि अभ्यास केला जातो.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.