Mumbai Airport वर १० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

371
Mumbai Airport वर १० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त
Mumbai Airport वर १० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Mumbai), सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी नुकतेच 1.022 किलो वजनाचे अवैध कोकेन (Cocaine) /मेथाक्वॉलोन जप्त केले.या अंमली पदार्थांचे बाजार मूल्य सुमारे 10.22. कोटी रुपये) आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. (Mumbai Airport )

( हेही वाचा : International Mother Language Day म्हणजेच आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन का साजरा केला जातो?

रविवारी (16 फेब्रुवारी), युगांडा एअरलाइन्सच्या (Uganda Airlines) फ्लाइट क्रमांक UR 430 ने एंटेबे, युगांडा येथून मुंबईला आलेल्या एका संशयित प्रवाशाला रोखण्यात आले.प्रवासाचे तपशील आणि मुंबईला भेट देण्याच्या उद्देशाबाबत विचारणा करताना, या प्रवाशाने अस्वस्थता दाखवली आणि पांढऱ्या रंगाच्या काही कॅप्सूलचे सेवन केल्याचे कबूल केले.हे ‘एनडीपीएस’ असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यानंतर प्रवाशाला वैद्यकीय देखरेखीखाली बरे वाटल्यानंतर, आदेश देण्याच्या विनंतीसह न्यायदंडाधिकारी यांच्याकडे नेण्यात आले. पुढील तीन दिवसांत, या प्रवाशाकडून 84 कॅप्सूल जप्त करण्यात आल्या. याचबरोबर वैद्यकीय सहाय्याने त्याच्याकडून एकूण 1.022 किलो पांढरा चुरा केलेला पदार्थ कोकेन/मेथाक्वॉलोन जप्त करण्यात आला. एनडीपीएस कायदा, 1985 च्या (Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1985) तरतुदीनुसार या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. (Mumbai Airport )

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.