-
ऋजुता लुकतुके
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) फलंदाजीत नाही तर क्षेत्ररक्षणात एक नवीन मापदंड सर केला. विराटने बांगलादेशी डावांतील ४३ व्या षटकांत झकर अलीचा झेल टिपला आणि तो विराटचा (Virat Kohli) एकदिवसीय क्रिकेटमधील १५६ वा झेल होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक झेल घेणारा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने अझहरुद्दीनच्या (Mohammad Azharuddin) विक्रमाशी बरोबरी केली आहे. झकर अली ६८ धावांवर बाद झाला.
Most Catches as fielder in ODIs for India:
Virat Kohli – 156*
M Azahruddin – 156
Sachin Tendulkar – 140 pic.twitter.com/Al5oictOej
— Tanuj Singh (@ImTanujSingh) February 20, 2025
(हेही वाचा – भारतीय वंशाचे Kash Patel एफबीआयचे नवे संचालक; अमेरिकन सिनेटची नियुक्तीला मंजूरी)
विराट आणि अझहरुद्दीन या दोघांचे १५६ झेल आहेत. तर त्यांच्या मागे सचिन तेंडुलकर (१४०), राहुल द्रविड (१२४) आणि सुरेश रैना (१०२) आहेत. भारतासाठी सर्वाधिक झेल टिपणारे क्रिकेटपटू,
विराट कोहली – १५६ झेल
मोहम्मद अझहरुद्दीन – १५६ झेल
सचिन तेंडुलकर – १४० झेल
राहुल द्रविड – १२४ झेल
सुरेश रैना – १०२ झेल
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत महेला जयवर्धने (२१८) आणि रिकी पाँटिंग (१६०) हे दोनच क्रिकेटपटू विराट आणि अझहरुद्दीनच्या पुढे आहेत. विराटने (Virat Kohli) या सामन्यात एकूण दोन झेल घेतले. आणि २२ धावा केल्या. भारताने हा सामना ६ गडी राखून जिंकला. आणि चॅम्पियन्स करंडकात (Champions Trophy) २ गुणांसह आपलं खातं उघडलं आहे. आता येत्या रविवारी भारताचा मुकाबला पाकिस्तानशी होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community