नवनिर्वाचित आमदारांसाठी आकाशवाणी आमदार निवासातील (Amdar Niwas) रूम्स वाटपाच्या प्रक्रियेत मोठा वाद निर्माण झाला आहे. विशेषतः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची रूम सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. विधान परिषद सदस्य सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी आपल्या मामांची म्हणजेच बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची रूम मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची जोरदार चर्चा आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मागील विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदारसंघातून बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) पराभूत झाले, त्यामुळे त्यांना मिळालेली आमदार निवासातील (Amdar Niwas) रूम रिकामी झाली. निवडणूक जिंकून विधानसभेत आलेले आमदार अमोल खताळ यांनी त्यावर दावा केला आहे. मात्र, सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनीही तीच रूम आपल्याला मिळावी, असा आग्रह धरल्याने हा वाद चांगलाच तापला आहे.
(हेही वाचा – परदेशात MBBS करायचं असेल तरी NEET आवश्यक; MCI च्या नियमावर ‘सुप्रीम’ शिक्कामोर्तब)
सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्याकडे आधीच आमदार निवासातील (Amdar Niwas) एक रूम आहे, जी त्यांचे वडील आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्याकडे असताना त्यांना मिळाली होती. आता मामांचीही रूम हवी असल्याने त्यांनी प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोप अमोल खताळ यांनी केला आहे.
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
अमोल खताळ यांनी या प्रकरणी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांच्याकडे तक्रार केली असून, विधानसभा अध्यक्षांनाही भेटणार असल्याचे सांगितले आहे. “प्रत्येक आमदाराला एकच रूम मिळते, मग सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) दोन रूम का मागत आहेत? आम्ही नवीन आमदारांनी कुठे राहायचं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
(हेही वाचा – International Mother Language Day म्हणजेच आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन का साजरा केला जातो?)
राजकीय पाठबळाची चर्चा
मनोरा आमदार निवासाचे (Amdar Niwas) काम सुरू असल्याने आणि मॅजेस्टिक आमदार निवास बंद असल्याने आकाशवाणी आमदार निवासातील (Amdar Niwas) रूम्स अत्यंत मर्यादित आहेत. अशा परिस्थितीत एकाच आमदाराला दोन रूम देण्याचा प्रयत्न होतोय का? आणि त्यामागे कोणत्या नेत्यांचे पाठबळ आहे? या चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे. यावर आता प्रशासन काय भूमिका घेते आणि हा वाद कसा सुटतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community