केंद्रीय गृहमंत्री Amit Shah २२ फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर येणार

42
केंद्रीय गृहमंत्री Amit Shah २२ फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर येणार
केंद्रीय गृहमंत्री Amit Shah २२ फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर येणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे दि. २२ फेब्रुवारी रोजी पुणे (Pune) दौऱ्यावर असणार आहे. पश्चिम विभागीय बैठकीसाठी अमित शाह (Amit Shah) येत आहेत. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून वानवडी वाहतूक विभाग आणि बाणेर रोडवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. यासंदर्भातील आदेश वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (Amol Zende ) यांनी दिले. (Amit Shah)

( हेही वाचा : Virat Kohli : विराट कोहलीचे एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५६ झेल)

पश्चिम विभागीय बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे दि. २२ फेब्रुवारी रोजी पुणे (Pune) दौऱ्यावर असणार आहेत.यानिमित्त महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादर आणि नगर हवेली, दमण आणि दीव या राज्याचे व्हीआयपीदेखील हजर राहणार आहेत.यासाठी वानवडी वाहतूक विभाग आणि बाणेर रोडवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.वानवडी वाहतूक विभागांतर्गत पाण्याची टाकी सर्कल ते टर्फ क्लब रोडदरम्यान दुतर्फा वाहतूक शनिवारी (दि. २२) सुरू राहणार आहे. पुणे विद्यापीठ चौक ते चांदणी चौक – पाषाण रोड,पुणे विद्यापीठ चौक ते राधा चौक – बाणेर रोड, पुणे विद्यापीठ चौक ( Pune Vidyapeeth Chowk) ते राजीव गांधी पूल – औंध रोड या रस्त्यावर सर्व प्रकारच्या जड, अवजड वाहनांना तसेच मिक्सर, डंपर, हायवा व स्लो मूव्हिंग (जेसीबी, रोड रोलर) शनिवारी मध्यरात्री १२ ते रविवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सर्व रस्त्यांवर बंदी घालण्यात आली आहे. (Amit Shah)

विद्यापीठ चौकाकडून बाणेर रोडने राधा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी गणराज चौकामधून डावीकडे वळून किया शोरूम अंडरपास किंवा ननावरे अंडरपास मार्गे जावे. मुंबई-बंगळुरू बायपासवरून (Mumbai-Bangalore Bypass) बाणेर रोडवर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी बालेवाडी जकात नाका येथून डावीकडे वळण घेऊन हायस्ट्रिट मार्गे गणराज चौकातून इच्छितस्थळी जावे.पुणे शहरातून हिंजवडी, वाकड, लोणावळा, मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पुणे विद्यापीठ चौकातून बाणेर रोडमार्गे न जाता पाषाण रोडवरून चांदणी चौकमार्गे जावे अथवा पुणे विद्यापीठ चौकातून औंध रोड मार्गे जावे. (Amit Shah)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.