SSC Exam : पहिल्याच दिवशी दहावीचा पेपर फुटला ; पेपरचे फोटो व्हायरल

149
SSC Exam : पहिल्याच दिवशी दहावीचा पेपर फुटला ; पेपरचे फोटो व्हायरल
SSC Exam : पहिल्याच दिवशी दहावीचा पेपर फुटला ; पेपरचे फोटो व्हायरल

राज्यात १० वी (SSC Exam) व १२ वीच्या परीक्षा होत आहेत. गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्ण राज्यात ‘कॉपीमुक्त अभियान’ (Copy-free campaign) राबविण्यात येत आहे. यादरम्यान, शिक्षण वर्तुळात खळबळ उडवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. आजपासून दहावी (SSC exam) बोर्ड परीक्षा सुरू झाल्या असून पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर (Exam) फुटल्याचे वृत्त आहे. (SSC Exam)

हेही वाचा-LoC वरील गोळीबाराच्या घटनांनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये फ्लॅग मिटिंग

जालन्यातील एका परीक्षा केंद्रावर दहावीचा (10 Th Exam) मराठीचा पेपर फुटला असून पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच उत्तर पत्रिकेच्या झेरॉक्स समोर आल्या आहेत. जालन्यातील बदनापूर येथील प्रकार असून या घटनेनं शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे. (SSC Exam)

हेही वाचा-परदेशात MBBS करायचं असेल तरी NEET आवश्यक; MCI च्या नियमावर ‘सुप्रीम’ शिक्कामोर्तब

सकाळी 11 वाजता मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच बदनापूर शहरातील सीएसी केंद्रांवर उत्तर पत्रिकाची झेरॉक्स मिळत असल्याच समोर आलं आहे. मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्याने शहरातील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार बदनापूरमध्ये समोर आला आहे. (SSC Exam)

हेही वाचा-Mumbai Airport वर १० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

जालन्यातील मंठा तालुक्यातील तळणी येथे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातल्या तळणी येथे दहावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉप्या पुरवणाऱ्यांची गर्दी केंद्राबाहेर पाहायला मिळाली, मराठीच्या पहिल्याच पेपरला, केंद्राबाहेर कॉपी पुरवण्यासाठी गर्दी आणि हुल्लडबाजी पाहायला मिळाली. तळणी गावातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रावरचा हा प्रकार आहे, त्यामुळे आत मध्ये परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना बाहेरील गोंधळाचा परीक्षेदरम्यान त्रास सहन करावा लागला. (SSC Exam)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.