बिहारच्या (Bihar) जमुई येथील एका सरकारी शाळेत मुख्याध्यापकांनीच इयत्ता दुसरीतील मुलीचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. सरकारी शाळेचे मुख्याध्यापक शमशेर आलम (Shamsher Alam) यांनी २० रुपयांचे आमीष दाखवत अल्पवयीन बालिकेचे लैंगिक शोषण (sexual abuse) केले आहे. या घटनेनंतर अल्पवयीन बालिकेने भीतीपोटी शाळेत जाणे बंद केले.
(हेही वाचा – LoC वरील गोळीबाराच्या घटनांनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये फ्लॅग मिटिंग)
मुलीच्या आई वडिलांनी जेव्हा तिला शाळेत न जाण्याचे कारण विचारण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिने आईला शाळेतील प्रिसिंपलने केलेले कृत्य सांगितले. “हे घे २० रूपये, तुझं तोंड बंद ठेव, पैसे आले, तर तुला सर्वांत आधी मिळतील” असे मुख्याध्यापकांनी म्हटल्याचे मुलीने सांगितले. ही घटना कळताच शाळा परिसरात गावकऱ्यांची मोठी गर्दी झाली आणि त्यांनी शाळेतील मुख्याध्यापकांच्या विरोधात तीव्र निदर्शने केली. पीडित मुलीच्या आजीने शमशेर आलम याला चपलेने चोपले.
त्यांनी संबंधित प्रिसिंपलविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी आलम याला अटक करून कोर्टात हजर केले. (Bihar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community