
भारत 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत असून उत्तर प्रदेशने 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. महाकुंभमुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेत 3 लाख कोटींची वृद्धी होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी शुक्रवारी विधानसभेत केले.
(हेही वाचा – Israel मध्ये रेल्वे-बस सेवा बंद; तीन बसमध्ये लागोपाठ स्फोट)
यासंदर्भात योगी (CM Yogi Adityanath) म्हणाले की, भारत आज जगातील 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. आगामी 2027 मध्ये भारत 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा देश बनेल यात कोणतीही शंका नाही. विरोधकांना हे चांगले वाटत नाही. कारण या लोकांचा स्वत:चा काही अजेंडा असू शकतो. ते देशाचा विकास मानणार नाहीत. भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशांवरून एक विस्तृत कार्यक्रम आखण्यात आला आहे. या अनुशंगाने उत्तर प्रदेशनेही 2022 मध्ये 10 विभागात विभागणी करून कार्यक्रम राबवले जात आहेत. मासिक स्वरूपात डॅशबोर्डवर याची समीक्षा होते. सोबतच दर तीन महिन्यांनी मी स्वत: त्याची समीक्षा करतो. उत्तर प्रदेशचा विकास दर हा देशातील सर्वोत्तम विकास दर असल्याचे मुख्यमंत्री योगींनी (CM Yogi Adityanath) सांगितले.
(हेही वाचा – परराज्यातून येणाऱ्या रुग्णांना शुल्क आकारा; महापालिका आयुक्तांची भेट घेत Raj Thackeray यांनी केली मागणी)
आमच्या 10 क्षेत्रांमध्ये औद्योगिक विकास, एमएसएमई, आयटी इलेक्ट्रॉनिक्स यांचा समावेश आहे. दुसरे म्हणजे कृषी क्षेत्र त्यात शेतीशी संबंधित सर्व संस्था आहेत. तिसरे सामाजिक क्षेत्र, चौथे शहरी विकास, पाचवे महसूल कर क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, गृह क्षेत्र, वैद्यकीय आरोग्य क्षेत्र, सेवा क्षेत्र आणि पर्यटन यांचा विस्तार केला जात आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील 10 वर्षात 25 कोटी लोकांना गरीबीच्या रेषेतून वर काढण्याचे काम केले आहे. उत्तर प्रदेश सरकारने 10 वर्षात 6 कोटी लोकांना गरीबी रेषेतून बाहेर काढले. फक्त महाकुंभ आयोजनाने उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेत 3 लाख कोटींची वाढ होणार आहे. महिलांनाही प्रत्येक विभागात प्रगतीची संधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. यावेळी समाजवादी पक्षावर टीका करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) म्हणाले, उत्तर प्रदेश हा नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध राज्य होते. मात्र समाजवादी पक्षाने त्याला एक आजारी राज्य बनवले. येणाऱ्या काळात उत्तर प्रदेश राज्य प्रगतीच्या शिखरावर असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community