“मुंबईतील ओव्हल, आझाद आणि क्रॉस मैदानांच्या भाडेपट्टा नूतनीकरणासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करावे” – DCM Ajit Pawar

39
"मुंबईतील ओव्हल, आझाद आणि क्रॉस मैदानांच्या भाडेपट्टा नूतनीकरणासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करावे" - DCM Ajit Pawar
  • प्रतिनिधी

“मुंबईतील ओव्हल मैदान, आझाद मैदान आणि क्रॉस मैदान ही केवळ खेळांसाठीच वापरण्यात यावीत,” असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी दिले आहेत. या मैदानांवरील भाडेपट्टा करार नूतनीकरणासाठी महसूल, क्रीडा, सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाने समन्वय साधून नवे सर्वसमावेशक धोरण तयार करावे, असेही त्यांनी सांगितले.

मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, बीएमसी आयुक्त भूषण गगराणी, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे, तसेच क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा – ‘शिवाजी विद्यापीठा’चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ नामांतराची Hindu Janajagruti Samiti ची आंदोलनाद्वारे मागणी !)

“मैदान केवळ खेळासाठीच राहावे!” – अजित पवार यांचा स्पष्ट आदेश

मुंबईतील ओव्हल, आझाद आणि क्रॉस मैदानांवर अनेक क्लब खेळाडूंना प्रशिक्षण आणि सरावाच्या सुविधा देतात. मात्र, या तिन्ही मैदानांचा उपयोग फक्त खेळासाठीच केला जावा, असे स्पष्ट करत “व्यावसायिक किंवा बिगर-खेळाशी संबंधित उपक्रमांना या मैदानांवर स्थान नसावे,” असा ठोस आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी दिला.

भाडेपट्टा करारासाठी नव्या धोरणाची आखणी

ही मैदानं महसूल विभागाच्या मालकीची असून क्रीडा विभागामार्फत क्लबांना भाडेपट्ट्यावर दिली जातात. मात्र, सध्याचा भाडेपट्टा करार कालबाह्य झाल्याने याच्या नूतनीकरणासाठी सरकारने नवे धोरण तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्याने तयार होणारे धोरण मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी (DCM Ajit Pawar) दिली.

(हेही वाचा – Mahakumbh : महाशिवरात्रीच्या तयारीवर मुख्यमंत्री योगींचं विशेष लक्ष ; जाणून घ्या कशी आहे तयारी ?)

“खेळाडूंना उत्तम सुविधा द्या – स्वच्छतागृहे आणि चेंजिंग रूम उभारण्याचे निर्देश”

खेळाडूंच्या सोयीसाठी मैदानांवर अत्याधुनिक स्वच्छतागृहे आणि चेंजिंग रूम उभारण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या. मात्र, “ही सुविधा मैदानाच्या एका कोपऱ्यात उभारावी, जेणेकरून मैदानाच्या सौंदर्यावर परिणाम होणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी चार विभागांना आदेश

महसूल, क्रीडा, सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागांनी एकत्र येऊन भाडेपट्टा नूतनीकरणासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करावे आणि ते विहित वेळेत पूर्ण करावे, असा आदेशही अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी दिला.

खेळाडूंना अधिकाधिक संधी देण्यासाठी सरकारचा पुढाकार

राज्यातील खेळाडूंसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. “खेळ आणि खेळाडूंसाठी सरकार सकारात्मक धोरण आखत आहे,” असेही अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी सांगितले. मुंबईतील क्रीडापटू आणि क्रीडाप्रेमींना यामुळे मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.