Chhatrapati Sambhaji Maharaj यांच्या बदनामी प्रकरणी विकीपीडियावर गुन्हा दाखल

168

छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या विषयी चुकीची माहिती विकीपीडियाने प्रसारित केली असल्याने विकीपीडियावर आता कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त लिखाण विकीपीडियावर (Wikipedia controversial statement) टाकणाऱ्या लेखकांवर गुन्हा दाखल होणार आहे. विकीपीडियाला संभाजी महाराजांविषयीचा वादग्रस्त कंटेंट (Contentious Content) हटवण्यासाठी तीन दिवसांचा वेळ देण्यात आला होता. मात्र विकीपीडियाने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता थेट कारवाईचा बडगा सायबर पोलिसांनी (Cyber ​​Police) उचलला आहे. (Chhatrapati Sambhaji Maharaj)

महाराष्ट्र सायबर सेल (Maharashtra Cyber ​​Cell) विकीपीडियावर असलेल्या चार ते पाच लेखकांवर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. विकीपीडिया हे एक ओपन प्लॅटफॉर्म असल्याने काही लोकांना त्यांचे लिखाण त्यावर प्रकाशित करता येतात. सायबर सेलने जवळपास 10 ते 15 ईमेल विकीपीडियला पाठवले असून त्यांच्याकडून एकही उत्तर आले नाही. त्यामुळे महाराष्ट्र सायबर सेलने संबंधित लेखकांवर गुन्हा दाखल केला आहे.

(हेही वाचा –कल्याण-डोंबिवलीतील ६५ इमारतींमधील रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही; Dr. Shrikant Shinde यांचे आश्वासन )

‘छावा’ चे प्रखर तेज पसरले

छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज हे सुसंस्कृत, विद्वान आणि महान योद्धे होते. त्यांना जवळपास 13 हून अधिक भाषांचे ज्ञान अवगत होते. ते शास्त्र आणि शस्त्र पारंगत होते. बुधभूषण हा ग्रंथ (Budhabhushan Granth) त्यांनी लिहिला. इतर ही स्फुट साहित्याचा उल्लेख करण्यात येतो. स्वराज्यासाठी त्यांनी हौतात्म्य पत्करले. ते अजरामर झाले. पण त्यानंतर काही बखरकारांनी आणि कथित इतिहासकारांनी असूयेपोटी त्यांचा बदनामीचा प्रयत्न केला. पण अनेक इतिहासकारांनी अस्सल दाखल्यासह त्यांचे कर्तृत्व समोर आणले. छावाचे प्रखर तेज आज सगळीकडे पसरले आहे.

विकिपीडियावरील लेखकांवर गुन्हा

विकिपीडियावर संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त लिखाण टाकणाऱ्या लेखकांवर गुन्हा दाखल होणार आहे. समाजात तेढ निर्माण होईल असे लिखाण विकिपीडियावर अपलोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार आहे. विकिपीडियाला हा कंटेंट हटवण्यासाठी तीन दिवसांचा वेळ देण्यात आला होता. मात्र विकिपीडियाकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही.

महाराष्ट्र सायबर सेल विकिपीडियावर असलेलेल्या कंटेंटसंदर्भात चार ते पाच लोकांवर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती समोर येत आहे. विकिपीडिया हा एक ओपन फ्लॅटफॉर्म आहे. तिथे काही ठराविक लोकांना स्वत:चे लिखाण अपलोड करण्याची मुभा आहे.

(हेही वाचा – Mahakumbh : महाशिवरात्रीच्या तयारीवर मुख्यमंत्री योगींचं विशेष लक्ष ; जाणून घ्या कशी आहे तयारी ?)

विकिपीडियावर संभाजी महाराजाबद्दल (Sambhaji Maharaj) वादग्रस्त लिखाण करणारे अडचणीत आले आहेत. महाराष्ट्र सायबर सेलने विकिपीडियाच्या ४ ते ५ एडिटर्सवर गुन्हा दाखल केला आहे. सायबर सेलने जवळपास १० ते १५ ईमेल विकिपीडियाला केले होते. एकही ईमेलला विकिपीडियाने उत्तर दिले नाही. त्यामुळे आता महाराष्ट्र सायबर सेल सबंधित लेखकांवर गुन्हा दाखल करत आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.