मुंबईतील आझाद मैदान, क्रॉस मैदान आणि ओव्हल मैदानातील भूखंडांच्या भाडेपट्टा कराराच्या नूतनीकरणासंदर्भात २१ फेब्रुवारी या दिवशी बैठक पार पडली. खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. मुंबईतील ओव्हल मैदान, आझाद मैदान (Azad Maidan) आणि क्रॉस मैदानातील भूखंडांच्या भाडेपट्टा कराराचे क्रीडा क्लबसोबत नूतनीकरण करण्यासाठी महसूल, क्रीडा, सार्वजनिक बांधकाम व नगरविकास विभागाने एकत्र येऊन समन्वयाने स्वतंत्र, सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे निर्देश बैठकीत दिले. कोणत्याही परिस्थितीत खेळांची मैदाने ही केवळ खेळांसाठीच वापरली गेली पाहिजेत, अशा सूचना या वेळी दिल्या. (Ajit Pawar)
(हेही वाचा – Weather Update : 13 राज्यांमध्ये पावसाचा इशारा, बर्फवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद, 300 वाहने अडकली)
नव्याने तयार करण्यात येणारे हे धोरण मंजुरीसाठी मंत्रीमंडळासमोर ठेवून त्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल.
याचबरोबर आझाद मैदान, ओव्हल मैदान (Oval Maidan) व क्रॉस मैदानावर खेळाडूंसाठी स्वच्छतागृहे व चेंजिंग रूम उभारण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. ही स्वच्छतागृहे अत्याधुनिक करताना खेळाच्या सरावाला बाधा येऊ नये, तसंच मैदानाचे सौंदर्य खराब होऊ नये, याची दक्षता घेत ती मैदानाच्या एका कोपऱ्यात उभारण्यात यावीत, असे सूचित केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आझाद, ओव्हल आणि क्रॉस मैदानांच्या (Cross Maidan Garden) लीजबाबत बैठक झाली. या बैठकीस एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक, एमसीए पदाधिकारी, तसेच इतर संबंधित मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. या वेळी या विषयावर सकारात्मक आणि फलदायी चर्चा झाली. (Ajit Pawar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community