मायमराठीचा जागर करण्यासाठी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत संपन्न होत आहे. दरम्यान या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते पार पडले. तसेच दीपप्रज्वलन करून पंतप्रधानांनी या संमेलनाचे उद्घाटन केले. नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे हा सोहळा पार पडला. (Marathi Sahitya Sammelan 2025)
या संमेलनासाठी मराठी सारस्वतांची मांदियाळी दिल्लीत (Marathi Sahitya Sammelan 2025, Delhi) जमली आहे. देश-विदेशातील साहित्य रसिक या संमेलनाला (Marathi Literary Conference) मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. तारा भवाळकर (Dr. Tara Bhavalkar) आहेत. तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) हे उपस्थित आहेत. तसेच राज्यातील साहित्यिक या सोहळ्यास उपस्थित आहेत.
(हेही वाचा – Weather Update : 13 राज्यांमध्ये पावसाचा इशारा, बर्फवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद, 300 वाहने अडकली)
मराठी साहित्य संमेलनासाठी मोठ्या संख्येने साहित्य रसिक उपस्थित
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारपासून दिल्लीत सुरुवात झाली आहे. या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. या संमेलनासाठी साहित्य रसिकही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उपस्थित राहिले आहेत. त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतरचे साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून मोदी दुसरे पंतप्रधान असणार आहेत.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community