मुंबईत ‘हाउसिंग जिहाद’ चा कट?; Sanjay Nirupam यांची सरकारकडे चौकशीची मागणी

199
मुंबईत ‘हाउसिंग जिहाद’ चा कट?; Sanjay Nirupam यांची सरकारकडे चौकशीची मागणी
  • प्रतिनिधी

“मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांमध्ये हिंदूंना अल्पसंख्याक करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा गंभीर आरोप शिवसेना उपनेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केला आहे. जोगेश्वरीतील दोन एसआरए प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असून, मुस्लिम विकासक मुंबईची लोकसंख्या रचना बदलण्याचा डाव आखत आहेत, असा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

जोगेश्वरीत हिंदूंना अल्पसंख्याक करण्याचा कट?

निरुपम (Sanjay Nirupam) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “जोगेश्वरी पश्चिम येथील श्री शंकर एसआरए प्रकल्प आणि ओशिवरा पॅराडाईज-१ आणि २ या प्रकल्पांमध्ये हिंदूंना अल्पसंख्याक करण्याचा प्रयत्न होत आहे.” काही विकासक एसआरए अधिकाऱ्यांच्या संगनमताने बेकायदेशीररित्या मुस्लिम रहिवाशांचे नाव पात्र करून घेत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

(हेही वाचा – राज्यात Cyber ​​Crime ची संख्या वाढली; २०१६ ते २०२४ पर्यंतचा आकडा आला समोर)

“एका व्यक्तीच्या नावे १७ आणि १९ घरे!”

श्री शंकर एसआरए प्रकल्पातील रहिवाशांची संख्या सुरुवातीला ६७ होती, त्यातील फक्त ७ मुस्लिम होते. मात्र, अंतिम परिशिष्ट-२ यादीत रहिवाशांची संख्या १२३ झाली आहे. त्यामध्ये रहीम घासवाला नावाच्या व्यक्तीच्या नावावर १७ घरे पात्र ठरवण्यात आली आहेत. ओशिवरा पॅराडाईज-१ आणि २ प्रकल्पांमध्येही असाच प्रकार घडला असून, एका व्यक्तीच्या नावावर तब्बल १९ घरे नोंदवली गेली आहेत. हे स्पष्टपणे नियमबाह्य असून, विकासक आणि ‘एसआरए’ प्रशासन यांच्या संगनमताने हा गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केला.

“मुंबईच्या डेमोग्राफीला धोका!”

निरुपम (Sanjay Nirupam) यांनी हा प्रकार “हाउसिंग जिहाद” असल्याचा दावा करत, “हिंदू रहिवाशांना जाणूनबुजून अपात्र ठरवून मुस्लिमांची वस्ती वाढवण्याचा कट रचला जात आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन चौकशी करावी,” अशी मागणी केली.

(हेही वाचा – Weather Update : 13 राज्यांमध्ये पावसाचा इशारा, बर्फवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद, 300 वाहने अडकली)

सरकारने त्वरित कारवाई करावी

निरुपम (Sanjay Nirupam) यांनी या मुद्द्यावर सरकारला जाब विचारला असून, “मुंबईतील प्रत्येक मुस्लिम विकासकाच्या प्रकल्पाची चौकशी झाली पाहिजे. झोपडपट्टी पुनर्विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात घोटाळे आणि लोकसंख्या बदल घडवले जात आहेत,” असा आरोप केला आहे.

सरकारची भूमिका काय?

संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांच्या या गंभीर आरोपांवर राज्य सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईतील एसआरए प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचा आरोप याआधीही अनेकदा झाला आहे, मात्र, या प्रकरणात सरकार कोणती भूमिका घेते आणि कोणती कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.